काहिरा : अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिस्त्रच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी आज मिस्त्रच्या अल-हकीम मशिदीचा दौरा करणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी इजिप्तमधील कहिरा येथील ११व्या शतकातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळाला श्रद्धांजली अर्पण करतील. अल-हकीम मशीद आणि मिस्त्र यांचे सामायिक समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष आहे. या मशिदीचे भारताच्या दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे आज रविवारी मोदींचा मशीद दौरा भारतासाठी विशेष आहे.
फातिमी राजवंशाने बनवली मशीद : इजिप्त सरकारच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयाने सांगितले की, भारतातील दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मिस्त्रमधील भारताचे राजदूत अजीत गुप्ते म्हणाले की, 11व्या शतकात इजिप्तवर फातिमी राजवंशाचे राज्य असताना बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला आपले पंतप्रधान भेट देतील. बोहरा समाज 1970 पासून मशिदीची देखभाल करत आहे. ते म्हणाले, 'म्हणूनच पंतप्रधानांचे बोहरा समाजाशी खूप प्रेम आहे. बोहरा समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची त्यांच्यासाठी ही संधी असेल. दरम्यान पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदी विराजमान होण्यापासून त्यांचे बोहरा समुदायाशी चांगले संबंध आहेत.