महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

PM Modi Australia Visit : पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर, ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आणखी दृढ करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत. सिडनीमध्ये पंतप्रधान मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांची प्रशंसा केली आहे.

PM Modi Australia Visit
पंतप्रधान मोदी

By

Published : May 23, 2023, 11:03 AM IST

पंतप्रधान मोदी सोमवारी सिडनीला पोहोचले

सिडनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी सिडनीला पोहोचले असून तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांची प्रशंसा केली. पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही देशांमधील उच्च पातळीवरील परस्पर विश्वासामुळे कालांतराने विशेषत: संरक्षण आणि सुरक्षेच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिडनी येथे ऑस्ट्रेलियन सुपर कंपनीचे सीईओ पॉल श्रोडर यांची भेट घेतली, तर आज ते ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत.

ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध पुढील स्तरावर नेण्याची इच्छा : ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध आणखी दृढ करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले. भारत-पॅसिफिक संरक्षण संबंध अधिक दृढ करून मुक्त भारताच्या उभारणीला मदत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-पॅसिफिकला हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद, दळणवळणाच्या सागरी मार्गांची सुरक्षा, चाचेगिरी, बेकायदेशीर मासेमारी अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान सोमवारी सिडनीला पोहोचले :संयुक्त प्रयत्नातूनच ही आव्हाने सोडवली जाऊ शकतात, असा भारताचा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. तीन देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सिडनीला पोहोचले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना प्रिय मित्र म्हणून संबोधून पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवी दिल्ली आणि कॅनबेरा यांच्यातील द्विपक्षीय संबंध तेथे झपाट्याने वाढणाऱ्या भारतीय नागरिकांद्वारे जोपासले जात आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रवासी भारतीय नागरिक गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. ते म्हणाले की, वेगाने विस्तारत असलेला प्रवासी भारतीय नागरिक दोन देशांमधील 'जिवंत पूल' म्हणून काम करत आहेत. क्रिकेटच्या प्रेमाने हे नागरिक जोडलेले आहेत. तसेच द्विपक्षीय संबंधांना चालना देत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details