महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Papua New Guinea PM : पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान पडले मोदींच्या पाया! प्रोटोकॉल मोडून केले भव्य स्वागत - पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपान येथून पापुआ न्यू गिनीला पोहोचले. यावेळी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करत त्यांच्या चरणांना स्पर्श केला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

Papua New Guinea PM
पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान

By

Published : May 21, 2023, 8:31 PM IST

पापुआ न्यू गिनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी एका द्विपक्षीय परिषदेत सहभागी होण्यासाठी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. यावेळी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी केवळ पंतप्रधान मोदींचे स्वागतच केले नाही, तर प्रोटोकॉल मोडून त्यांनी पंतप्रधान मोदींचे पायही स्पर्श केले. पंतप्रधान मोदी आणि जेम्स मारापे 22 मे रोजी फोरम फॉर इंडिया - पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन करतील. यावेळी मोदींचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले.

मोदींसाठी मोडली 'ही' जुनी परंपरा : पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या दरम्यान परदेशी भारतीयांनीही त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, पापुआ न्यू गिली या देशाचा नियम आहे की, येथे सूर्यास्तानंतर कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. मात्र यावेळी ही परंपरा मोडत पंतप्रधान मोदी येथे पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ देशाने आपली जुनी परंपरा मोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

मोदी पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान : तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची पापुआ न्यू गिनीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधानांचे येथे जपानहून आगमन झाले असून तेथे त्यांनी अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. मोदी आणि मारापे सोमवारी FIPIC च्या तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन करतील. या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण सर्व 14 पॅसिफिक बेट देशांनी (पीआयसी) स्वीकारल्याबद्दल मी आभारी आहे, असे मोदींनी म्हटले आहे. FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान झाली होती.

परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार : FIPIC परिषदेत 14 देशांचे नेते सहभागी होणार आहेत. कनेक्टिव्हिटी आणि इतर समस्यांमुळे हे सर्व देश क्वचितच एकत्र येतात. PIC मध्ये कूक आयलंड, फिजी, किरिबाटी, मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नाउरू, नियू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुवालू आणि वानुआतु या देशांचा समावेश आहे. यावेळी मोदी मारापे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल बॉब डेडे यांचीही भेट घेतील.

हेही वाचा :

  1. PM Modi Jacket : मोदींच्या 'या' जॅकेटची जगभरात चर्चा, वाचा काय आहे खास..
  2. PM Modi Meet Zelenskyy : पंतप्रधान मोदींनी जपानमध्ये घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट
  3. G20 Meet Security : G20 दरम्यान 26/11 सारख्या हल्ल्याचा कट उघड, विदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी बदल

ABOUT THE AUTHOR

...view details