इस्लामाबाद पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव असतानाही पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत भारताकडून आयोजित SCO counter terror drills in India करण्यात येणाऱ्या दहशतवादविरोधी कवायतींमध्ये भाग घेणार आहे. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली. द एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राच्या वृत्तानुसार पाकिस्तानी आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे दहशतवादविरोधी सरावात भाग घेतला आहे. परंतु पाकिस्तान भारतात अशा प्रकारच्या सरावात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ Pakistan SCO counter terror drills असेल. SCO counter terror drills
शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी वृत्तपत्राद्वारे सांगितले होते की पाकिस्तान SCO च्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी फ्रेमवर्क अंतर्गत या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सरावात सहभागी होईल.