महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Pakistan Militants Attack : पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात 4 पोलीस अधिकारी ठार, 6 जखमी - पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ला

पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहा अधिकारी जखमी झाले. स्थानिक पोलीस अधिकारी अशफाक खान यांनी सांगितले की, दहशतवादी संशयितांचा शोध सुरू आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Pakistan Militants Attack
पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात 4 पोलीस अधिकारी ठार

By

Published : Mar 30, 2023, 11:57 AM IST

Updated : Mar 30, 2023, 12:44 PM IST

पेशावर : तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे वायव्य पाकिस्तानमधील एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला. रस्त्याच्या कडेला बॉम्ब टाकून दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्ल्यात चार पोलीस अधिकारी शहीद झाले. तर अन्य सहा अधिकारी जखमी झाले. या माहितीला पोलीस आणि बंडखोर दोघांनीही बातमीत दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लक्की मारवत येथील पोलीस स्टेशनवर हा हल्ला झाला.

दहशतवादी संशयितांचा शोध सुरू : इतर काही प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पोलीस अधिकारी येथे आले होते. पोलिस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात सहा अधिकारी जखमी झाले. स्थानिक पोलीस अधिकारी अशफाक खान यांनी सांगितले की, दहशतवादी संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिस ठाण्यावर दोन हल्ले झाले. आधी पोलिस ठाण्यावर हल्ला झाला, नंतर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या वाहनाला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले, असे ते म्हणाले. पाकिस्तानी तालिबानने दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणून ओळखला जाणारा गट अफगाणिस्तानच्या तालिबानपासून वेगळा आहे परंतु त्याच्याशी संबंधित आहे. 2021 मध्ये अफगाण तालिबानने 20 वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकन आणि नाटो सैन्याने अफगाणिस्तान सोडले तेव्हा काबुलवर ताबा मिळवला होता. तेव्हापासून टीटीपीचे मनोबल खूप वाढले आहे.

पाकिस्तानमध्ये हल्ल्यांमध्ये वाढ झाली :तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणून ओळखला जाणारा हा गट वेगळा असूनही अफगाणिस्तानच्या तालिबानशी जवळचा संबंध ठेवतो. पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तान सरकारसोबतचा युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर पाकिस्तानमध्ये हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. 2021 मध्ये अफगाण तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यापासून टीटीपीचा आत्मविश्वास वाढला आहे. तालिबानचा ताबा घेतल्यापासून टीटीपीचे अनेक नेते आणि लढवय्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळाला आहे. गेल्या दोन दशकांमध्ये पाकिस्तानने अनेक दहशतवादी हल्ले पाहिले आहेत, परंतु नोव्हेंबरपासून टीटीपीने पाकिस्तान सरकारसोबत युद्धविराम संपवला तेव्हापासून त्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा :US School Shooting : अमेरिकेतील शाळेत महिलेचा अंदाधुंद गोळीबार! 3 लहान मुलांसह 6 जण ठार

Last Updated : Mar 30, 2023, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details