महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2022, 1:07 PM IST

ETV Bharat / international

Pakistan Court Declared : पीएम शाहबाज यांचा मुलगा पाक न्यायालयाकडून फरार घोषित

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) नोव्हेंबर 2020 मध्ये शाहबाज आणि त्यांची मुले हमजा आणि सुलेमान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला ( Hamza and Suleman money laundering case ) होता. 28 मे रोजी सुलेमान आणि नक्वी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

SHAHBAZ SHARIFS
SHAHBAZ SHARIFS

इस्लामाबाद: पाकिस्तानातील एका न्यायालयाने शुक्रवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा धाकटा मुलगा सुलेमान शाहबाज आणि अन्य एका व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फरार घोषित ( Pakistan Court Declared Suleman Shahbaz absconding ) केले. 'डॉन' वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, लाहोर विशेष न्यायालयाने (मध्य-I) सुलेमान आणि ताहिर नक्वी यांना फरार घोषित केले. कारण त्यांनी हजर होण्यासाठी सांगून देखील ते हजर झाले नाहीत.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) नोव्हेंबर 2020 मध्ये शाहबाज आणि त्याची मुले हमजा आणि सुलेमान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँडरिंग ( Hamza and Suleman money laundering case ) विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. 28 मे रोजी सुलेमान आणि नक्वी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. याच सुनावणीत न्यायालयाने गेल्या महिन्यात यूएईमध्ये मरण पावलेल्या मलिक मकसूद या आणखी एका संशयितासाठी अटक वॉरंट जारी केले. एफआयएने 11 जून रोजी सुलेमान, नक्वी आणि मकसूद यांच्यासाठी जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटबाबत अहवाल सादर करण्यात आला होता.

एफआयएने आपल्या अहवालात म्हटले होते की, सुलेमान त्याच्या पत्त्यावर उपस्थित नसल्यामुळे वॉरंटची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि तो परदेशात गेला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सुलेमान आणि नक्वी यांच्या मालमत्ता तसेच मकसूदच्या मृत्यू प्रमाणपत्राची माहिती मागितली.

सुनावणीला उपस्थित राहण्यापासून एकवेळ सूट देण्याची पंतप्रधान शाहबाज यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली, परंतु पुढील सुनावणीत त्यांनी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. यानंतर न्यायालयाने सुनावणी 30 जुलैपर्यंत पुढे ढकलली. डिसेंबर 2021 मध्ये एफआयएने साखर घोटाळा प्रकरणात 16 अब्ज रुपयांच्या मनी लाँड्रिंगमध्ये ( 16 billion money laundering case ) कथित सहभागासाठी शाहबाज आणि हमजा यांच्या विरोधात विशेष न्यायालयात चलन सादर केले होते.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एफआयएच्या अहवालानुसार ही रक्कम गुप्त खात्यांमध्ये ठेवण्यात आली होती. या रकमेचा (16 अब्ज रुपये) साखर व्यवसायाशी (शहबाज कुटुंबाचा व्यवसाय) काहीही संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा -Former Nepal PM In India : नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details