महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

One World Family The Art of Living : संगीत नृत्यासह प्रेरणांद्वारे एकता समरसतेचा जागतिक संदेश देणारा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जागतिक सांस्कृतिक महोत्सव - आर्ट ऑफ लिव्हिंग प्रेरणादायी उदाहरण

One World Family The Art of Living : वॉशिंग्टन डीसी मधील आयकॉनिक नॅशनल मॉल एका भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या अभूतपूर्व दहा लाख लोकांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचा भाग होत विक्रम स्थापित केला. जगातील १८० देशांतील लोक मानवता, शांतता आणि संस्कृतीच्या या धरतीवरील सर्वात मोठ्या उत्सवासाठी एकत्र आले होते. हा सोहळा जणू जगातील विविध संस्कृतींचा एक भव्य मेळा होता.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 10:22 PM IST

Updated : Sep 30, 2023, 10:43 PM IST

समरसतेचा जागतिक संदेश देणारा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जागतिक सांस्कृतिक महोत्सव

बेंगळुरू One World Family The Art of Living : या कार्यक्रमात वसुधैव कुटुंबकमचा संदेश घेऊन जागतिक स्तरावरील मान्यवर एकत्र आले होते. यात मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि ग्रॅमी अवॉर्ड विजेते आणि इतर नामवंत कलाकारांच्या विविध रंगी नृत्याचे सादरीकरण केले गेले. जागतिक मानवतावादी आणि शांतता प्रस्थापित करणारे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी यावेळी सांगितले की, “आपली विविधता साजरी करण्याचा हा एक सुंदर प्रसंग आहे. आपली धरती खूप वैविध्यपूर्ण आहे, तरीही आपल्या मानवी मूल्यांमध्ये अंतर्निहित एकता आहे. आज या निमित्ताने समाजाला अधिकाधिक आनंद देण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू या. तीच खरी मानवता आहे.

आपण सर्व एकमेकांसाठी आहोत -कोणत्याही उत्सवाला ज्ञानाचा आधार नसेल तर तो तेवढा मनाला भिडणारा होत नाही. ज्ञान आपल्या सर्वांमध्ये आहे. ज्ञान म्हणजे आपण सर्व आगळे वेगळे आहोत आणि तरी आपण सर्व एक आहोत हे ओळखणे. मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो - आपण सर्व एकमेकांसाठी आहोत. आपण सर्व एका विशाल जागतिक कुटुंबात आहोत. चला आपल्या जीवनाचा उत्सव साजरा करू या. चला आपण येणारी आव्हाने स्वीकारत त्याला व्यावहारिकपणे सामोरे जाऊ या. ह्या आणि येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहूया.

प्रसन्नतेची भावना जागृत -या जागतिक कार्यक्रमात ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या चंद्रिका टंडन आणि २०० कलाकारांनी अमेरिका द ब्युटीफुल आणि वंदे मातरम् ही गीते सादर केली. एक हजार कलाकारांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय संगीत वादनाच्या सिम्फनीचा पंचभूतम हा अनोखा कार्यक्रम सादर केला. ग्रॅमी पुरस्कार विजेते मिकी फ्री आणि इतर जगप्रसिद्ध गिटार वादकांच्या नेतृत्वात एक हजार जागतिक गिटार वादकांनी आकर्षक संगीत सादरीकरण केले, तसेच आफ्रिका, जपान आणि मध्य पूर्व देशामधील पारंपारिक नृत्य सादर करण्यात आली. या संगीतमय रजनीने सर्वांची संवेदना आणि प्रसन्नतेची भावना जागृत झाली. सर्वात शेवटी, स्किप मार्लेच्या रेगे रिदम्स द्वारे 'वन लव्ह' या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने सांगता झाली.

आर्ट ऑफ लिव्हिंग प्रेरणादायी उदाहरण -यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आपण सर्वजण समृद्धी वाढवण्याचा आणि आपल्या धरतीचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असताना, निसर्गावर अत्याचार करणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे स्वाभाविक आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा मानवनिर्मित असो, संघर्ष असो किंवा व्यत्यय असो, हे महत्त्वाचे आहे की परस्परावलंबी जगात, आपण नेहमी एकमेकांसाठी असतो. आर्ट ऑफ लिव्हिंग प्रेरणादायी उदाहरण आहे आणि युक्रेन संघर्षात त्यांनी अलीकडेच केलेले आगळे वेगळे कार्य मी वैयक्तिकरित्या पाहिले आहे. आज त्यांचा संदेश, तुमचा संदेश, आपणा सर्वांचा संदेश काळजी, औदार्य, समजूतदारपणा आणि सहकार्याचा असावा. यामुळेच आम्हा सर्वांना येथे एकत्र आणले आहे.

जागतिक मान्यवरांची उपस्थिती -जागतिक संस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जागतिक मान्यवरांची उपस्थिती होती. ज्यात बान की-मून, संयुक्त राष्ट्रांचे 8 वे सरचिटणीस; वॉशिंग्टन डी.सी.चे महापौर म्युरिएल बॉझर; मिशिगन काँग्रेसमन ठाणेदार, हकुबुन शिमोमुरा, खासदार, माजी शिक्षण, संस्कृती, क्रीडा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, जपान; एरिक सोल्हेम, माजी UN उप सरचिटणीस आणि UNEP चे कार्यकारी संचालक, तसेच नॉर्वेचे माजी मंत्री यांचा समावेश होता. अनेक जागतिक आव्हानांना तोंड देत असलेल्या विवादित जगात एकता, शांतता आणि सुसंवादी सहअस्तित्वासाठी आपली समान दृष्टी असल्याच्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आतून शांत राहणे आवश्यक -द रेव्हरंड बिशप एमेरिटस मार्सेलो सांचेझ सोरोंडो, पॉन्टिफिकल अकादमी ऑफ सायन्सेसचे कुलपती एमेरिटस यांच्यामार्फत या प्रसंगी एक मोलाचा संदेश देत म्हणाले की, “जागतिक शांतता मिळवण्यासाठी आपल्याला आंतरिक शांती हवी आहे. शांततामय संवाद साधण्यासाठी, आपण आतून शांत राहणे आवश्यक आहे. आणि शांतपणाने जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची गरज आहे. शांततेत जगण्याची कला अंगी बाणवण्यासाठी देवाशी संवाद साधला पाहिजे. देव माणसाचा शत्रू नाही. देव मित्र आहे. देव हे प्रेम आहे आणि, देव मिळवण्यासाठी, आपल्याला ध्यानाकडे, प्रार्थनेकडे परत यावे लागेल.

संस्कृतींचा समृद्ध उत्सव -आपल्याला आपल्या मुळांकडे परत यायला हवे. म्हणून, या नाजूक क्षणी, आपण देवाला आवाहन केले पाहिजे आणि पोप फ्रान्सिसच्या नावाने, आपण, सर्व मानवजातीच्या बंधुत्वाला, तुम्हाला आणि या खूप मोठ्या सभेला मी आशीर्वाद देतो, आणि मला वाटते की हे जीवन जगण्याचे कृत्य खरोखरच आपल्या मानवतेचे भविष्य घडवेल.” गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनने आयोजित केलेल्या जागतिक संस्कृती महोत्सवाने सीमा ओलांडून मानवता आणि बंधुत्वाच्या धाग्याने एकत्र बांधलेल्या संस्कृतींचा समृद्ध उत्सव साजरा केला. WCF संगीत आणि नृत्याद्वारे स्थानिक आणि देशी परंपरांचे जतन करण्याची तसेच प्रत्येकाला रुची आणि आनंद घेण्याची संधी प्रदान करते. प्रेम, करुणा आणि मैत्री यांसारख्या वैश्विक मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ही चळवळ आहे.

प्रेरणादायी दृष्टीकोनाची प्रशंसा -यावेळी बोलताना युनायटेड नेशन्सचे 8 वे सरचिटणीस, बान की मून म्हणाले, "संस्कृती पूल बांधते, भिंती तोडते, संवाद आणि परस्पर समंजसपणाने जगाला एकत्र आणते आणि लोक आणि राष्ट्रांमध्ये एकता आणि सुसंवाद वाढवते. संस्कृती सर्व जागतिक नागरिकांमध्ये शक्तिशाली देवाणघेवाण निर्माण करू शकते. आज, जगातील सर्व सांस्कृतिक समृद्धता, युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल मॉलमध्ये एकत्र आली आहे. मी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या एकता आणि विविधतेच्या प्रेरणादायी दृष्टीकोनाची प्रशंसा करतो. आपल्याला यापैकी अधिक उत्सवांची, अधिक एकत्र येण्याची, अधिक शांतता आणि अधिक सहकार्य, एकता आणि भागिदारीची आवश्यकता आहे. आता आपण ज्या मोठ्या आव्हानांना तोंड देत आहोत त्यावर आपण अशा प्रकारे चिकाटीने टिकून राहू. अशा प्रकारे आम्ही शांतता निर्माण करू आणि संघर्ष सोडवू, भूक संपवू, निरोगी जीवन सुनिश्चित करू, दर्जेदार शिक्षण देऊ आणि महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करू. अशा प्रकारे आम्ही पुढे जाऊ आणि कोणालाही मागे राहू देणार नाही. ”

एक वेगळी अनुभूती -यावेळी हजारो राष्ट्रध्वज एकात्मतेच्या भावनेने हवेत फडकत असल्याने गर्दीचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता आणि कलाकारांमध्येही तेवढीच उर्जा पसरली होती. "हे जबरदस्त आणि खूप सुंदर आहे," मोहिनीअट्टम सादरीकरणाच्या नृत्य दिग्दर्शक बीना मोहन यांनी सांगितले, "या शोचा भाग बनणे हे एक स्वप्न आहे. हे काम एकत्रित सादर करणे हा माझ्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक अविश्वसनीय अनुभव होता. या अनुभवातून आम्ही सर्वजण तृप्त झालो आहोत. या कार्यक्रमानंतर, नक्कीच एक वेगळी अनुभूती, आत्मविश्वास, आनंद हा महोत्सव आपल्यासाठी घेऊन येत आहे." जागतिक संस्कृती महोत्सव 2023 जसजसा उलगडत जाईल, तसतसे आम्ही आणखी दोन दिवस सांस्कृतिक समृद्धी, एकता आणि जागतिक उत्सवाची आतुरतेने अपेक्षा करतो आहोत.

हेही वाचा..

  1. Sri Sri Ravi Shankar on New Education policy : नवीन शैक्षणिक धोरण हे क्रांतिकारी पाऊल; श्री श्री रविशंकर यांचे प्रतिपादन
  2. Sri Sri Ravi Shankar : भारतात विरोधी पक्ष कमकुवत असल्याने नेता निरंकुश वाटतो -श्री श्री रविशंकर
Last Updated : Sep 30, 2023, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details