वॉशिंग्टन :मोदींच्या अमेरिका दौऱ्यात निता मुकेश अंबानीच्या साडीची चर्चा होत आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्टेट डिनरसाठी नीता अंबानीने पारंपारिक पेहराव केला होता. त्यांनी या कार्यक्रमासाठी हस्तिदंती साडीची निवड केली होती. सुशोभित बॉर्डरसह सूक्ष्म सोनेरी काठांच्या बॉर्डरसोबत त्यांनी मॅचिंग ब्लाउज असा लूक केला होता. नीता अंबानीच्या साडीचा सॉफ्ट कलर पॅलेट पाश्चात्य सौंदर्यशास्त्राला पूरक आहे. त्यांच्या साडीतील शुद्ध सोनेरी धागा, चमकदार फॅब्रिक आणि सिल्हूट भारताच्या समृद्धीचे प्रदर्शन करते.
निता अंबांनी यांचा मेकअप :त्यांनी केलेहा पेहराव हा अतिशय अप्रतिम होता. त्यांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. दागिन्यांमध्ये निता अंबांनीनी मोत्याचा हार, जड कानातले, हातात चमकदार कडे आणि एक अलंकृत अंगठी घातलेली होती. त्यांनी केलेला पेहराव हा त्यामुळे अजूनच खुलला होता. त्या नेहमी आपल्या पेहरावासाठी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी कमीत कमी मेकअप केलेला होता. गुलाबी ओठ, परिभाषित भुवया आणि बिंदीने त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व्यक्त केले होते.
यूएस स्टेट डिनरला हजेरी : निता अंबांनी यांनी त्यांचे केस एका गोंडस अंबाड्यात बांधले होते, त्याला गजऱ्याने सजवले होते. निता अंबानी व मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमासाठी भारतीय पेहरावाची निवड केली होती. जी अत्यंत योग्य ठरली. आनंद महिंद्रा, इंद्रा नूयी, निखिल कामथ, सत्या नडेला आणि फॅशन डिझायनर करिश्मा स्वाली यांनीही यूएस स्टेट डिनरला हजेरी लावली होती. सुंदर पिचाई आणि अंजली पिचाई नीता हे अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या डिनरमध्ये झळकले होते.