न्यूयॉर्क :अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यूयॉर्क शहरात जंगी स्वागत केले. यावेळी या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेने सजलेले अनोखे नेहरू जॅकेट परिधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
गुजरात दिनानिमित्त बनवले होते जॅकेट :भारतीय वंशाच्या नागरिकांनी हे जॅकेट खास गुजरात दिनानिमित्त बनवले होते. याबाबत बोलताना मिनेश सी पटेल यांनी हे जॅकेट 2015 मध्ये गुजरात दिनानिमित्त बनवण्यात आले होते. आमच्याकडे यापैकी 26 जॅकेट असून या 26 जॅकेटपैकी चार आज येथे असल्याची माहिती मिनेश पटेल यांनी दिली. अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांचे मंगळवारी हॉटेल लोटे येथे भारतीय वंशाच्या नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
हॉटेलमध्ये घुमल्या भारत माता की जयच्या घोषणा :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्क शहरात मुक्काम करणार आहेत. पंतप्रधान मोदी थांबलेल्या हॉटेलमध्ये नागरिकांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याने परिसर चांगलाच दणाणून गेला. भारतीय वंशाच्या नागरिकांनी पंतप्रधानांना पाहून तिरंगी झेंडे फडकावले. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान त्यांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असलेल्या गर्दीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पंतप्रधानांनी हॉटेलमध्ये बोरा समाजाची बैठकही घेतली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिकेत भेटून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजत असल्याची माहिती दिली. आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा शांततेने आणि सहृदयपणे आमचे स्वागत केल्याने आम्ही खूप आनंदी झाल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद :न्यूयॉर्क शहरात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांशी हस्तांदोलन करत संवाद साधला. यावेळी भारतीय वंशांच्या नागरिकांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी विविध कंपन्यांचे सीईओ, नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांना भेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- PM Modi US Visit : भारत-अमेरिकेतील 'हे' पाच मोठे संरक्षण करार चीन, पाकिस्तानची झोप उडवतील! जाणून घ्या
- International Day of Yoga : पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरा करणार आंतरराष्ट्रीय योग दिन; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन