काबूल (अफगाणिस्तान) : शहरातील शिया बहुल परिसरात मंगळवारी मुलांच्या शाळेत झालेल्या बाँब हल्ल्यात सहा जण ( Multiple Blasts near Kabul School) ठार तर 11 जण जखमी झाले. राजधानीच्या पश्चिमेकडील दश्त-ए-बर्ची येथील अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये हा स्फोट झाला, असे काबूल पोलिस कमांडचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले. मात्र, या हल्ल्यात किती मुले जखमी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एका सुरक्षा अधिकाऱ्याने जर्मन वृत्तसंस्था डीपीएला सांगितले की, हे बॉम्बस्फोट हातबॉम्बने केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाळा राजधानीच्या पश्चिम भागात दश्त-ए-बर्ची येथे आहे. यापूर्वी इस्लामिक स्टेट गटाने लक्ष्य केले होते. या बॉम्बस्फोटात आमचे शिया बांधव मारले गेल्याचे काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी ट्विटरवर सांगितले.