महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Morocco Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं मोरोक्को हादरलं, २९६ जणांचा मृत्यू

Morocco Earthquake : उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान २९६ नागरिकांचा मृत्यू झाला. या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. वाचा पूर्ण बातमी..

Morocco Earthquake
मोरोक्को भूकंप

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 9:23 AM IST

रबात (मोरोक्को) Morocco Earthquake :मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे २९६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाले आहेत. सरकारकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. भूकंपानंतर राजधानी रबातमध्ये दहशत पसरली. काही क्षणातच रस्त्यावर लोकांची गर्दी झाली होती.

अनेक इमारतींचं झालंनुकसान: मिळालेल्या माहितीनुसार, मोरोक्कोमध्ये रात्री ११.११ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे प्रमुख शहरांमधील अनेक इमारतींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक नागरिक अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं सांगितलं की, भूकंपाची सुरवातीची तीव्रता ६.८ इतकी होती. तर मोरोक्कोच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि चेतावणी नेटवर्कनं रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७ इतकी मोजली.

भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता : मोरक्कोत या आधी अगादीरजवळ ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू मॅराकेचच्या दक्षिणेला अ‍ॅटलस पर्वत आणि लोकप्रिय मोरोक्कन स्की रिसॉर्ट ओकामेडेनच्या पश्चिमेला होता. हे उत्तर आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर तुबकलच्या जवळ आहे. मोरोक्कन नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले आहेत, यामध्ये भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळताना दिसत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला : मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. 'या दु:खाच्या काळात मोरोक्कोच्या नागरिकांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी नागरिक लवकरात लवकर बरं होवोत. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे', असं मोदींनी 'X' वर पोस्ट करत म्हटलं. या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, तर लाखो नागरिक जखमी झाले होते.

हेही वाचा :

  1. Florida Shooting : अमेरिकेत पुन्हा एकदा वंशभेदातून गोळीबार, तीन कृष्णवर्णीयांचा मृत्यू
  2. Plane Crash In Russia : ब्लादिमीर पुतीन यांना जेरीस आणणाऱ्या प्रिगोझिन यांचं जेट विमान 'क्रॅश', अपघातात सगळे प्रवासी ठार झाल्याची भीती
  3. Donald Trump News: तुरुंगात आत्मसमर्पण केल्यानंतर 20 मिनिटांतच सुटले डोनाल्ड ट्रम्प, दोन वर्षानंतर 'X' वर पोस्ट करून म्हणाले..

ABOUT THE AUTHOR

...view details