रबात (मोरोक्को) Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. मोरोक्कोमध्ये यालेल्या भूकंपाची तीव्रता ६.८ एवढी होती. या भूकंपातील मृतांची संख्या आता २,००० च्या पुढे गेली आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.
ऐतिहासिक इमारतींचं नुकसान देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर : या दुर्घटनेनंतर शनिवारी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मोरोक्कोचे राजे मोहम्मद यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथकं तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतरांगांना भूकंपाचा धक्का बसला. यामुळे भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या माराकेशमध्ये अनेक ऐतिहासिक इमारतींचं नुकसान झालं. बहुतेक नुकसान अल-हॉज आणि ताराउडंट प्रांतांमध्ये दक्षिणेकडील पर्वतीय भागात झालं आहे.
ऐतिहासिक इमारतींचं नुकसान जगभरातून मदतीचा ओघ सुरू : भूकंपाचं केंद्र १८.५ किमी खोल होतं. भूकंपाचे धक्के दक्षिणेकडील सिदी इफ्नीपासून उत्तरेला राजधानी रबातपर्यंत जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या पश्चिमेला ७२ किलोमीटर अंतरावर होता. माराकेश मोरोक्कोमधील एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे. या भीषण भूकंपानंतर मोरोक्कोला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तुर्कीनं रबातमधील अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर मदत म्हणून एक हजार तंबूंचं वाटप केलंय.
भूकंपस्थळाची पाहणी करताना अधिकारी नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला : आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करत भूकंपात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला. 'मोरोक्कोमधील भूकंपात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे मला खूप दुःख झाले. या दुःखाच्या वेळी माझ्या भावना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत, ज्यांनी भूकंपात आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे', असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा :
- Morocco Earthquake : मोरोक्कोमधील शक्तिशाली भूकंपात 1 हजार 37 नागरिकांचा मृत्यू
- Morocco Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यानं मोरोक्को हादरलं, २९६ जणांचा मृत्यू
- Earthquake Precautions: दिल्ली कोणत्या सिस्मिक झोनमध्ये येते? भूकंप झाल्यास करा 'या' उपाययोजना