काबुल : गेल्या वर्षी अमेरिकेचे समर्थन असलेल्या नागरी सरकारची हकालपट्टी केल्यानंतर तालिबानने देशाचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये स्फोट आणि हिंसाचार ही नित्याची बाब बनली आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या स्फोटात किमान 16 लोक ठार आणि 24 जखमी ( Afghanistans religious school blast ) झाले आहेत.
North Afghanistan Blast अफगाणिस्तान हादरले! प्रार्थनेदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात 16 ठार, 24 जखमी
समंगणमधील आयबक शहरातील ( doctor of Samangan Provincial Hospital ) जाहदिया सेमिनरीमध्ये दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला, असे वृत्त स्थानिक माध्यमाने दिले आहे. समंगण प्रांतीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, या रुग्णालयात किमान 15 मृत आणि 27 जखमींना आणण्यात आले आहे, अशी माहिती वृतसंस्थेने दिली आहे.

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर अफगाणिस्तानमधील एका धार्मिक शाळेत ( blast hit a religious school in northern Afghanistan ) बॉम्बस्फोटात किमान 10 विद्यार्थी ठार झाले आहेत. दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले ( Interior Ministry spokesman Abdul Nafi Takor ) की, उत्तरी सामंगन प्रांताची राजधानी अयबक येथे झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने किंवा संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. तालिबानने मानवी आणि महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे अनेक नियम मोडले आहेत.