पंजाब ( पाकिस्तान ) :ईश्वरनिंदा केल्याप्ररणी नानकाना साहिब पोलीस ठाण्यातील एकाला जमावाने प्रचंड मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. मुहम्मद वारीस असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने कुराणाची विटंबना केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. मुहम्मद वारीसला जमावाने त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. मात्र तसेच न झाल्याने संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यात दंगा केला.
पोलीस कंपाऊंडला वेढा : शेकडो तरुणांनी नानकाना साहिब पोलीस कंपाऊंडला वेढा घातला होता. एक माणूस शिडीचा वापर करून उंच गेट पार करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच गेटचे कुलूप उघडत होता. त्या व्यक्तीला पायांनी रस्त्यावर ओढले गेले, त्याचे कपडे काढून लाठ्या आणि काठ्यांनी मारले गेले. धातूच्या रॉडने मारहाण करण्यात आली आहे. जमावाचे रौद्ररूप पाहून स्टेशन हाऊस ऑफिसर वॉरबर्टन फिरोज भाटी आणि इतर पोलिस कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, दोन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर मुहम्मद वारीस परत आला. मुहम्मद वारीसने कुराणाच्या पवित्र कागदांवर त्याच्या आधीच्या पत्नीचे चित्र चिकटवून जादूटोणा केला होता. त्यांनी सांगितले की, कथित गुन्ह्याच्या बातम्यांमुळे रहिवासी संतप्त झाले. शेकडो लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला.
मुस्लीम बहुसंख्य देशात अशा घटना वारंवार :मुस्लीम बहुसंख्य देशात वारंवार अशा घटना होत आहेत. मुहम्मद पैगंबराच्या निंदेच्या अनेक घटना घडत आहेत. या आरोपांवरून लिंचिंग रोखण्यासाठी पुरेसे काम न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय अधिकार गटांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर दीर्घकाळ टीका केली आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार कुराणाची निंदा हा देखील गुन्हा आहे. ज्यात मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. 2021 मध्ये एका श्रीलंकन नागरिकाच्या, हत्येसह मुहम्मद पैगंबराची निंदा केल्याचे प्रकरण समोर आले होते. आरोप असलेल्या व्यक्तीविरोधात कारवाईची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणामुळे पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे. सुमारे 89 संशयितांचा समावेश असलेल्या सामूहिक खटल्यात श्रीलंकेच्या गारमेंट फॅक्टरी मॅनेजरला लिंच केल्याबद्दल सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.