महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इंग्लंडच्या राजकारणात दोन महिन्याच्या आत पुन्हा भूकंप, पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा - suella braverman

लिझ ट्रस यांनी युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपण कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेता म्हणून राजीनामा देत आहे. उत्तराधिकारी निवडला जाईपर्यंत मी पंतप्रधान म्हणून राहीन असे लिझ ट्रस यांनी स्पष्ट केले.

लिझ ट्रस यांचा युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा
लिझ ट्रस यांचा युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा

By

Published : Oct 20, 2022, 6:29 PM IST

Updated : Oct 20, 2022, 7:53 PM IST

लंडन - लिझ ट्रस यांनी युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपण कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेता म्हणून राजीनामा देत आहे. उत्तराधिकारी निवडले जाईपर्यंत मी पंतप्रधान म्हणून राहीन असे लिझ ट्रस यांनी स्पष्ट केले. केवळ दोन महिन्यांपेक्षा कमी काळ सत्तेत राहिल्यानंतर त्या पायउतार झाल्या आहेत. आपण ज्या कारणासाठी पंतप्रधान झालो, ते पूर्ण करु शकत नाही असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.

लिझ म्हणाल्या की, मोठ्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्यावेळी पदावर आले. अनेक कुटुंबांना आणि व्यवसायांना त्यांची बिले कशी भरायची याची चिंता होती. युक्रेनमधील पुतिनच्या युद्धामुळे आपल्या संपूर्ण खंडाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यातच आपला देश बराच मागे गेला. आर्थिक प्रगती खुंटली असेही त्या म्हणाल्या. जोपर्यंत पुढील नेता निवडला जात नाही तोपर्यंत आपण पंतप्रधानपदी राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

भारतीय वंशाच्या गृहमंत्री असणाऱ्या सुएला ब्रेव्हरमन यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज थेट पंतप्रधानांनी राजीनामा दिला. आपल्या हातून चुका घडल्या. मात्र आपण चुका केल्याच नाहीत, असे ढोंग आपल्याला करता येणार नाही, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले. आपल्याकडे काही जादूची कांडी नाही, की देशाचा कारभार नीट होईल असे मी सांगू शकेन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पत्रच याबाबत पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत.

पंतप्रधान ट्रस यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी सरकारच्या दिशेबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच मतदारांना दिलेली आश्वासने पाळू शकत नसल्याचेही त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे. ब्रेव्हरमन म्हणाल्या की त्यांनी संसदीय सहकाऱ्याला वैयक्तिक ईमेलवरून अधिकृत कागदपत्रे पाठवून नियमांचे तांत्रिक उल्लंघन केले. आता ट्रस यांनीही राजीनामा दिल्याने ब्रिटनची राजकीय अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होत आहे. आधीच आर्थिक संकटाने घेरले आहे. त्यातच आता राजकीय भूकंपावर भूकंप होत असल्याने ब्रिटनची पुढील राजकीय वाटचाल पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Last Updated : Oct 20, 2022, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details