महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2023, 9:33 AM IST

ETV Bharat / international

Khalistani Protest In UK : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, भारताने ब्रिटीश राजदूताकडे मागितले स्पष्टीकरण

लंडनमध्ये काल खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा ध्वज हटवण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने या घटनेचा तीव्र निषेध केला असून दिल्लीतील ब्रिटीश राजदूताकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

Khalistani Protest In UK
खलिस्तानी समर्थकांचा भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला

नवी दिल्ली : भारताने काल संध्याकाळी नवी दिल्लीतील ब्रिटनच्या राजदूताला बोलावून लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्या फुटीरतावाद्यांविरोधात अ‍ॅक्शन न घेतल्याने यूके सरकारकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भारताने ब्रिटनकडे या हल्याच्या वेळी सुरक्षेत झालेल्या दिरंगाईचे स्पष्टीकरण मागितले आहे.

खलिस्तान्यांनी तिरंगा खाली ओढला : रविवारी, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर खलिस्तानी समर्थक तिरंगा खाली ओढतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या आणि पंजाबमधील खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंह याच्या सुटकेची मागणी केली. यावेळी आंदोलक खलिस्तानी ध्वजही फडकवताना दिसले. आंदोलकांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असून तिरंगा तेथे फडकत असल्याचे उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 'स्कॉटलंड यार्ड'ने सांगितले की त्यांना या भागातील एका घटनेची माहिती मिळाली आहे, परंतु अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

ब्रिटनच्या राजदूताला स्पष्टीकरण मागितले :परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात फुटीरतावादी घटक घुसले, त्या वेळी सुरक्षेचा पूर्णपणे अभाव होता. आम्ही याबद्दल ब्रिटनच्या सर्वात जेष्ठ राजदूताला स्पष्टीकरण मागितले आहे. मंत्रालयाने व्हिएन्ना अधिवेशनातील तरतुदींनुसार यूके सरकारला त्यांच्या मूलभूत दायित्वांची आठवण करून दिली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थक नेते हे अमृतपाल सिंह याच्यावर भारत सरकार करत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून 'सार्वमत 2020' आयोजित करत आहे.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाय आवश्यक : परराष्ट्र मंत्रालयाने पुढे नमूद केले की, भारताला हे मान्य नाही की यूके सरकार त्यांच्या देशातील भारतीय राजनैतिक परिसर आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत उदासीन राहिले. मंत्रालयाने अपेक्षा केली की ब्रिटीश सरकार हिंसाचाराच्या या घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येक अतिरेक्याचा शोध घेण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू करेल. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाय आवश्यक होते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा :Punjab Police on Amritpal Singh : अमृतपालचा 'आयएसआय'शी संपर्क; खासगी लष्कर तयार करण्याच्या होता तयारीत, पोलिसांनी दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details