वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी पक्षांकडून तयारी सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे. त्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली आहे. कमला हॅरिस यांचे जो बिडेन यांच्याप्रती असलेलं वागणं अपमानकारक आहे, असे ट्रम्प म्हणाले.
'कमला हॅरिस अन् जो बिडेन यांची जोडी अमेरिकेसाठी चुकीची'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे. त्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली आहे. कमला हॅरिस यांचे जो बिडेन यांच्याप्रती असलेलं वागणं अपमानकारक आहे, असे ट्रम्प म्हणाले.
त्याने तिला निवडले याबद्दल मला थोडे आश्चर्य वाटले. जी व्यक्ती आपला अनादर करते, अशा व्यक्तीची निवड करणे मला थोडे कठिण वाटते. कमला हॅरिसने प्राथमिक निवडणुकांमध्ये अगदी खराब कामगिरी केली होती, असे व्हाइट हाऊस येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या टि्वटर व्हीडिओसुद्धा शेअर केला आहे. त्यातून त्यांनी कमला हॅरिस आणि जो बिडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. संथ बिडेन आणि बनावट कमला यांची जोडी एकमेंकासाठी योग्य आहे. मात्र, ती अमेरिकेसाठी चुकीची आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील डेमोक्रेटिकपक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी जो बिडेन यांची निवड झाल्यानंतर आता उपराष्ट्राध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. त्या भारतीय-जमैकन मूळच्या अमेरिकन आहेत. कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या. तसेच त्या यापूर्वी जो बिडेन यांच्यासोबत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. आता त्यांची पुन्हा डेमोक्रेटिक पक्षाकडून उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड केली आहे.