कीव (युक्रेन):अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची युक्रेनमध्ये जात भेट घेतली. ही भेट म्हणजे दोन्ही देशांमधील एकतेचा इशारा असल्याचे मानले जात आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची ही भेट झाली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष : मारिंस्की पॅलेसमध्ये झेलेन्स्की यांच्याशी भेट घेऊन, बायडेन यांनी अमेरिकेच्या अतिरिक्त अर्धा अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा करण्यावर आणि युक्रेनला अमेरिका आणि सहयोगी समर्थनाचे आश्वासन देण्यासाठी संघर्ष यावर टिप्पणी केली आहे. बायडेन म्हणाले, की वर्षभरानंतरही कीव उभे आहे आणि युक्रेन उभे आहे. लोकशाही उभी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे, जिथे युक्रेन रशियाला हार मानायला तयार नाही, तिथे रशियाही मागे हटण्याचे कोणतेही संकेत देत नाहीये.
युद्धात युक्रेनला नव्याने मदत केली : ही सगळी परिस्थिती अशी असली तरी मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे जो बायडेन यांची ही भेट सरप्राईज व्हिजिट आहे, कारण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती यापूर्वी समोर आलेली नाही. या भेटीदरम्यान जो बायडेन यांनी एक निवेदन जारी केले असून, या युद्धात युक्रेनला नव्याने मदत केली जाईल, असे ते म्हणाले आहेत.
व्हाईट हाऊसकडून एक सविस्तर निवेदन जारी केले : अमेरिका प्रत्येक परिस्थितीत युक्रेनच्या पाठीशी उभी आहे. सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे जो बायडेन यांनी आवर्जून सांगितले आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बायडेन यांच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला असून, अमेरिकेचा युक्रेनला पूर्ण पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे. व्हाईट हाऊसकडून एक सविस्तर निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये युक्रेनला अमेरिकेकडून कोणत्या मार्गाने आणि कोणत्या स्तरावर मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :'या' देशात मृत्यूच्या संख्येत 10 टक्के वाढ, जाणून घ्या कारण