वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन आणि फस्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांचे मोठ्या उत्साहाने व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. मोदीचे स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळ जो बायडेन आणि जिल बायडेन उभे असल्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी आपल्या कारमधून बाहेर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी हसतमुखाने मोदींचे स्वागत केले.
विकासाचे ड्रायव्हिंग इंजिन : व्हाईट हाऊसच्या भेटीपूर्वी, पंतप्रधान मोदींनी अप्लाइड मटेरियल्सचे अध्यक्ष आणि सीईओ गॅरी ई डिकरसन, मायक्रोन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष-सीईओ संजय मेहरोत्रा आणि जनरल इलेक्टिकचे अध्यक्ष आणि सीईओ एच लॉरेन्स कल्प जूनियर आणि जनरल इलेक्ट्रीक एरोस्पेसचे सीईओ यांची भेट घेतली. दरम्यान बुधवारी वॉशिंग्टन डीसी येथे आलेले पंतप्रधान मोदी यांनी ‘स्किलिंग फॉर फ्युचर’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, भारत आणि युनायटेड स्टेट्सची भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासामागील ड्रायव्हिंग इंजिन म्हणून काम करेल.
प्रगतीच्या वाढीचा वेग कायम राखण्यासाठी भारत आणि अमेरिकेला प्रतिभेची पाईपलाईन आवश्यक आहे. एका बाजुला अमेरिकेकडे टॉप क्लास शैक्षणिक संस्था आणि उच्च तंत्रज्ञान आहे. तर दुसरीकडे भारत असून भारताकडे सर्वात मोठी युवकांची ताकद आहे. म्हणूनच मला विश्वास आहे की भारत-अमेरिका भागीदारी शाश्वत आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाचे इंजिन सिद्ध होईल. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शैक्षिणक क्षेत्रातील कामगिरी : स्किलिंग फॉर फ्युचर या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतातील शैक्षणिक क्षेत्राची माहिती दिली. भारत सरकारने विद्यार्थ्यांच्या उज्ज्व भविष्यासाठी काय केले आहे, त्यावर पंतप्रधान मोदींनी यादरम्यान एक प्रकाशझोत टाकला. नवीन शैक्षणिक धोरणांची अमंलबजावणी आणि एकात्मिक शिक्षण आणि कौशल्य यासारख्या गोष्टी करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. विद्यार्थांसाठी नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. एकात्मिक शिक्षण आणि कौशल्ये आणली आहेत. भारताने स्किल इंडिया अंतर्गत, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, ड्रोन आणि इतर क्षेत्रात 15 अब्जाहून अधिक लोकांना कुशल केले आहे. पुढे बोलताना मोदींनी अमेरिकन विद्यार्थ्यांना भारतात येण्याचे आवाहन केले. युनायटेड स्टेट्सचे शेकडो शिक्षक आधीच भारतात आहेत. ते तंत्रज्ञान भागीदारीत भाग घेत असल्याचे मोदी म्हणाले.