तेल अवीव German Tattoo Artist : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर पोहोचताच अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता. दहशतवाद्यांनी गाझा पट्टीजवळ एका महिलेचीही हत्या केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिचा मृतदेह विवस्त्र करून, हात-पाय बांधून वाहनाला बांधले. यानंतर दहशतवाद्यांनी त्या मृतदेहाला पॅलेस्टिनमध्ये फिरवायला सुरुवात केली. ती महिला इस्रायली नसून जर्मन नागरिक असल्याचं समोर आलंय.
जर्मनीची रहिवासी असल्याचं समोर : इस्रायलच्या द्वेषानं आंधळे झालेल्या या दहशतवाद्यांनी रस्त्यावर उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर गोळ्या झाडायला सुरुवात केली होती. शनिवारी जेव्हा या महिलेला ठार मारल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला तेव्हा ती इस्रायलची सैनिक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता या मुलीची ओळख पटली असून झाली असून, ती जर्मनीची रहिवासी असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे 30 वर्षीय तरुणी शांततेसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत महोत्सवात होती. मात्र, अचानक दहशतवाद्यांनी तिथं गोळीबार सुरू केला.
चुलत बहिणीकडून पटली ओळख : इस्रायलच्या मिडिया रिपोर्टनुसार, तरुणीच्या चुलत बहिणीनं पीडितेला ओळखलं. ती म्हणाली की, कुटुंबानं तिच्या टॅटू आणि केसांवरून ओळखलं. हे कसं घडलं हे आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही काही सकारात्मक घडेल, याची अपेक्षा करतो. शांततेसाठी आयोजित संगीत कार्यक्रमाला ती गेली होती. आमच्या कुटुंबासाठी तिचा मृत्यू म्हणजे एक भयानक स्वप्न असल्याचं तिची चुलत बहिणीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.
आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू :हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत इस्त्राईलच्या 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 3200 लोक जखमी झाले आहेत. या तरुणीचा मृतदेह ट्रकच्या मागच्या बाजूला टाकण्यात आला होता. तिच्या आजूबाजूला दहशतवादी होते. दहशतवादी धार्मिक घोषणा देत तिच्यावर थुंकत होते. हा मृतदेह एका महिला इस्रायली सैनिकाचा असल्याचा दावा हमासनं केलाय. पण मृत तरुणीच्या चुलत बहिणीनं हत्या झालेली मुलगी तिची बहीण असल्याचं सांगितलं. तिनं मृतदेहाच्या पायावरील टॅटू आणि केसांवरून बहिणीला ओळखलं.
हेही वाचा :
- Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
- Israel Hamas Conflict : इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाला धोका?
- Israel War : इस्रायलमध्ये युद्ध भडकलं? हमासनं गाझा पट्टीतून ५००० रॉकेट डागले