महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इस्रायल-हमास संघर्षाचे दीड महिने; युद्धात 13000 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू - पॅलेस्टाईन

Israel Hamas War : इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यापासून गाझा पट्टीमध्ये पॅलेस्टाईनच्या मृतांची संख्या 13 हजारांपेक्षा जास्त झाल्याचं गाझाच्या सरकारी माध्यम कार्यालयानं जाहीर केलंय. त्यामुळे युद्धाची तीव्रता समोर आलीय.

इस्रायल-हमास संघर्ष
इस्रायल-हमास संघर्ष

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:58 AM IST

गाझा Israel Hamas War :इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता एका महिन्याहून अधिक कालावधी पुर्ण झालाय. तरीही हे युद्ध सुरुच आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई आणि जमीन अशा दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडं हमासचे सैनिकही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी हमासनं इस्रायली सैन्यदलाचे रणगाडे उडवले.

पॅलेस्टाईनच्या मृतांची संख्या 13 हजारांहून अधिक : इस्रायल-हमास संघर्ष सुरु झाल्यापासून गाझा पट्टीत पॅलेस्टाईनच्या मृतांची संख्या 13 हजारां पेक्षा जास्त झालीय. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयानं ही माहिती दिलीय. मीडिया कार्यालयाचे महासंचालक इस्माईल अल थवाब्ता यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की मृतांमध्ये 5 हजार 500 मुलं आणि 3 हजार 500 महिलांचा समावेश आहे. तर 30 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या 1200 लोकांचा मृत्यू : अल थवाब्ता यांनी सांगितलं की, या युद्धात बेपत्ता झालेल्यांची संख्या 6 हजारांहून अधिक झालीय. ज्यात 4 हजार मुलं आणि महिलांचा समावेश आहे. इस्रायली हल्ल्यांमुळं नष्ट झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली हे दबले गेले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हमासनं केलेल्या अचानक हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलनं गेल्या काही आठवड्यांपासून गाझावर हल्ले केले होते. त्यादरम्यान हमासच्या अतिरेक्यांनी सुमारे 1 हजार 200 लोक मारले होते. तसंच 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते.

दक्षिण गाझावर इस्रायली बॉम्बहल्ल्यात 26 पॅलेस्टाईन नागरिक ठार : शनिवारी दक्षिण गाझामधील खान युनिस शहरावर इस्रायलनं केलेल्या बॉम्बफेकीत कमीतकमी 26 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. यात मुलांची संख्या अधिक होती. पॅलेस्टाईनच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली विमानांनी खान युनूस शहरातील अपार्टमेंटवर अनेक हल्ले केले. यात मृत्युमुखी पडलेल्यांशिवाय इतरही अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र इस्रायली सैन्यदलानं या घडामोडीवर कोणतंही भाष्य केलेलं नाही.

इस्रायलकडून हमासविरोधातील फुटेज जाहीर-इस्त्रायलनं गाझामधील शिफा हॉस्पिटलवर ताबा मिळविला आहे. या रुग्णालयाचा वापर करून हमासचे दहशतवादी नागरिकांना ओलीस ठेवत होते, असा इस्त्रायलचा आरोप आहे. या आरोपाला पुष्टी देणारा व्हिडिओ इस्रायलनं समाज माध्यमात शेअर केला. एक्सवरील पोस्टमध्ये इस्त्रायलनं म्हटलं की, हत्याकांडाच्या दिवसापासून शिफा रुग्णालयातील फुटेज पाहण्यात येत आहे. 7 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 10:42 ते 11:01 च्या दरम्यान नेपाळी नागरिक आणि एक थाई नागरिकाला सशस्त्र हमास दहशतवाद्यांनी घेरले. यात ओलिसांपैकी एक जखमी असून त्याला हॉस्पिटलच्या बेडवर नेले जात असल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा इस्रायलनं दावा केला.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : हमासनं गाझातील रुग्णालयात शस्त्रं लपवली? आयडीएफचा दावा काय? वाचा सविस्तर
  2. Israel Hamas War : जो बायडेन यांच्या आदेशानंतर इस्रायल 'चार' पाऊलं मागे, युद्धाबाबात घेतला 'हा' मोठा निर्णय
  3. Israel Hamas War : गाझा हे मुलांसाठी स्मशान- अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केले दु:ख

ABOUT THE AUTHOR

...view details