महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख ठार, पॅलेस्टिनी नागरिकांचं दक्षिण गाझाकडे स्थलांतर - इस्रायल हमास संघर्ष

Israel Hamas War : इस्रायल-हमास संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. काल (१३ ऑक्टोबर) इस्रायलच्या हवाई दलानं गाझावर जोरदार हल्ले केले. या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख मारला गेलाय. इस्रायलनं खात्री पटल्यावर आज ही गोष्ट जाहीर केलीय. वाचा पूर्ण बातमी..

Israel Hamas War
Israel Hamas War

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 4:23 PM IST

तेल अवीव (इस्रायल) Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात एक मोठं अपडेट समोर आलंय. इस्रायलनं रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख मुराद अबू मुराद ठार झाल्याचं इस्रायलच्या वायुसेनेनं सांगितलं. हमासनं शनिवारी केलेल्या हल्ल्यादरम्यान अबू मुराद दहशतवाद्यांना मार्गदर्शन करत होता, असं इस्रायली वायुसेनेचं म्हणणं आहे.

हमासच्या मुख्यालयावर हल्ला केला : 'X' वरील एका पोस्टमध्ये इस्रायली हवाई दलानं म्हटलं की, 'काल हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी दहशतवादी संघटना हमासच्या मुख्यालयावर हल्ला केला. येथून संघटनेच्या हालचालींचं व्यवस्थापन केलं जात होतं. या हल्ल्यादरम्यान मुराद अबू मुराद मारला गेला. त्याचा शनिवारी झालेल्या हल्ल्यात सक्रिय सहभाग होता. तो दहशतवाद्यांना मार्गदर्शन करत होता', असं इस्रायली हवाई दलानं सांगितलं.

अनेक दहशतवाद्यांना ठार केलं : इस्रायली हवाई दलानं सांगितलं की, त्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरीचं नेतृत्व करणाऱ्या हमास कमांडोंच्या डझनभर ठिकाणांवर हल्ला केला होता. 'काल रात्री इस्रायली लढाऊ विमानांनी संपूर्ण गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. यामध्ये हमास दहशतवाद्यांच्या डझनभर ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं. यासह इस्रायली सैनिकांनी लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी सेलची ओळख पटवली आणि अनेक दहशतवाद्यांना ठार केलं', असं इस्रायली सैन्यानं सांगितलं आहे.

उत्तर गाझाच्या नागरिकांना इशारा : इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉन्रिकस यांनी शनिवारी सांगितलं केलं की, 'गाझा पट्टीतील लोक इस्रायलचा इशारा ऐकत आहेत. ते दक्षिणेकडे स्थलांतरीत होत आहेत'. इस्रायलच्या सैन्यानं काल उत्तर गाझाच्या ११ लाख नागरिकांना २४ तासांत आपली घरं रिकामी करण्याचा इशारा दिला होता. 'आम्ही शनिवारच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या भागावर जोरदार बॉम्बवर्षाव करणार आहोत. त्यामुळे २४ तासांच्या आत आपली घरं रिकामी करून दक्षिण गाझाकडे स्थलांतर करा', असा इशारा इस्रायलनं दिला होता.

हेही वाचा :

  1. Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
  2. Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी
  3. Israel Palestine Conflict : हमासचा हल्ला रोखण्यात आम्ही अपयशी, इस्रायलच्या सैन्यदलाची कबुली

ABOUT THE AUTHOR

...view details