जेरुसलेम Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धात तात्पुरता युद्धबंदी करार करण्यात आला आहे. या दरम्यान हमासनं 13 इस्रायलच्या ओलिस नागरिकांची सुटका केली आहे. तर बदल्यात इस्रायलन 39 जणांना सोडलं आहे. हमासनं युद्धविराम कराराच्या उल्लंघनाचा इस्रायलवर आरोप करत ओलिसांची सुटका करण्यास विलंब केला.
हमासनं केली 13 ओलिसांची सुटका :इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या मध्यस्थीनं तात्पुरता युद्धबंदी करार करण्यात आला आहे. त्यामुळे हमासनं दुसऱ्या फेरीत इस्रायलच्या 13 नागरिकांची सुटका केली आहे. तर बदल्यात इस्रायलनं 39 बंदिवानांना सोडलं आहे. इस्रायलनं सोडलेल्या पॅलेस्टाईनच्या बंदिवानांना घेऊन जाणारी बस रविवारी सकाळी वेस्ट बँकमध्ये आली. इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस बस अल बिरेहमध्ये आल्यावर पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं.
सुटका झाल्यानंतर नातेवाईकांना भेटताना ओलिस हमासनं जारी केला ओलिसांचा व्हिडिओ :हमासनं 13 ओलिसांची सुटका केली असून यात किबुत्झ बेरीच्या नागरिकांचा समावेश असल्याचं इस्रायली सैन्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. हमासकडून सोडण्यात ओलिसांना इस्रायलला हलवण्यात आलं. त्यांना निरीक्षणासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यासाठी रुग्णालयात नेलं जात आहे. हमासकडून ओलिसांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यात दिसणारे ओलिस हादरलेले दिसत आहेत. मात्र त्यांची शारीरिक स्थिती चांगली असल्याचं स्पष्ट होत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांना रेड क्रॉसच्या वाहनांकडं नेताना ओलिस दिसून येत आहेत.
ओलिसांमध्ये सात मुलं आणि सहा महिलांचा समावेश : हमासनं इस्रायलच्या सोडलेल्या ओलिसांमध्ये सात मुलं आणि सहा महिलांचा समावेश आहे. ही मुलं 3 ते 16 वर्ष वयाची आहेत. तर महिला 18 ते 67 वयाच्या दरम्यानच्या असल्याची माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानं दिली आहे. दरम्यान इस्रायलनं सोडलेल्या पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या आगमनासाठी वेस्ट बँक बीटुनिया शहरात हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा :
- Israel Hamas War : इस्रायलमधील युद्धाचा अनुभव सांगताना आव्रहम यांना कोसळलं रडू; 'ईटीव्ही भारत'सोबत Exclusive संवाद
- Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं