गाजा सिटी Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा गाझा पट्टीतील अल-अहली अरब रुग्णालयावर बॉम्बहल्ला झाला. यात किमान 500 लोकांचा मृत्यू झालाय. हा हल्ला इस्त्रायलनं केल्याचा दावा गाझामधील सत्ताधारी हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं केला. कोसळलेल्या रुग्णालयाच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती आहे. तर इस्रायली संरक्षण दलानं (आयडीएफ) हॉस्पिटलवर आम्ही हल्ला केला नसल्याचं सांगत हॉस्पिटलमधील बॉम्ब स्फोटासाठी हमासला जबाबदार धरलं.
तर हा हल्ला सर्वात प्राणघातक : पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा हल्ला 2008 पासून लढलेल्या पाच युद्धांमधील सर्वात प्राणघातक इस्रायली हवाई हल्ला असेल. इस्रायलनं शहर आणि आसपासच्या भागातील सर्व रहिवाशांना दक्षिण गाझा पट्टीत हलवण्याचे आदेश दिल्यानंतर बॉम्बस्फोटापासून ते वाचले जातील या आशेनं गाझा शहरातील अनेक रुग्णालयं शेकडो लोकांसाठी सध्या आश्रयस्थानं झाली आहेत.
रुग्णालयात हमासच्या रॉकेटचा स्फोट, इस्रायलनं हल्ला केला नाही; नेतान्याहूचा दावा : इस्रायल-हमास युद्धादरम्यान गाझा पट्टीतील अल-अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात किमान 500 लोकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यासाठी पॅलेस्टाईननं इस्रायलला जबाबदार धरलंय. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत हा आम्ही केला नसल्याचं सांगितलंय. नेतन्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, संपूर्ण जगाला हे माहित असले पाहिजे की, गाझामधील क्रूर दहशतवाद्यांनी हॉस्पिटलवर हल्ला केला होता. आयडीएफनं हल्ला केला नाही. तसंच ते म्हणाले की, ज्यांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली, ते स्वतःच्या मुलांनाही मारत आहेत. याला दुजोरा देताना इस्रायल संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं ट्विटरवर पोस्ट केलंय की, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना हॉस्पिटलवरील हल्ल्यासाठी जबाबदार आहेत.
- युद्धादरम्यान बायडेन इस्रायलला भेट देणार : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज इस्रायलला पोहोचणार आहेत. बायडेन आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इस्रायलला पोहोचण्याची शक्यत आहे. तिथं ते सुमारे 5 तास थांबणार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :
- Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, राष्ट्रध्यक्ष जो बायडन इस्रायलला जाणार
- Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं
- Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख ठार, पॅलेस्टिनी नागरिकांचं दक्षिण गाझाकडे स्थलांतर