इस्लामाबाद - उच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती अथर मिनाल्लाह यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानच्या समा न्यूजने ही बातमी दिल्याचे एएनआयने म्हटले आहे.
इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला रद्द करण्याचा निर्णय - quash contempt case against Imran Khan
उच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ चे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला फेटाळून लावला आहे. महिला न्यायाधीशांना धमकावल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांचे लेखी उत्तर स्वीकारले. त्यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीसही मागे घेण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण - पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख न्यायालयात हजर झाले. या प्रकरणाची पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ होते. खंडपीठाच्या इतर सदस्यांमध्ये न्यायमूर्ती मोहसिन अख्तर कयानी, मियांगुल हसन औरंगजेब, तारिक महमूद जहांगिरी आणि बाबर सत्तार यांचा समावेश होता.