मुंबईदेशात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा Indian Independence Day उत्साह असताना दुसरीकडे पाकिस्तानातील रबाबवादक सियाल खान Pakistani artist Siyal Khan याने रबाबवर भारताचे राष्ट्रगीत जण गण मन वाजवले Indian national anthem played on Rabab आहे. त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक भारतीयांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
देशामध्ये चहुबाजूने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत. भारतामध्ये सर्व नागरिक अत्यंत आनंदाने उत्साहाने तिरंग्याला नमन करत अभिवादन करत घरोघर एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर अनेक कटू आठवणी जशा आहे तशा चांगल्या आठवणी देखील आहेत. पाकिस्तानमधील रबाबवादक सियाल खान याने भारताचे राष्ट्रगान त्याच्या रबाब या वाद्यावर अत्यंत सुरेल रीतीने वाजवलेले आहे. भारताच्या नागरिकांसाठी ही माणुसकीची भेट असल्याचं त्याने ट्विटरवर म्हटलं आहे.