वॉशिंग्टन : एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि पेगासस स्पायवेअरसह अनेक मुद्द्यांवर खटला दाखल केला lawsuit against PM Modi Andhra CM Reddy Adani आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाने या सर्व नेत्यांसह इतर अनेकांना समन्स जारी केले आहेत. न्यूयॉर्कमधील प्रख्यात भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी याला 'डेड ऑन अरायव्हल खटला' असे म्हटले Dead on Arrival Lawsuit आहे.
मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरुद्ध हा खटला रिचमंड येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ लोकेश वुय्यूरू यांनी दाखल केला आहे. खटल्यात नाव असलेल्या इतरांपैकी प्रोफेसर क्लॉस श्वाब, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरने आरोप केला की, मोदी, रेड्डी आणि अदानी आणि इतर लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ज्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअरचा वापर समाविष्ट आहे.