महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

UNGA Emergency Session : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला सुनावले! - संयुक्त राष्ट्र आमसभा

संयुक्त राष्ट्र महासभेच्या आपत्कालीन विशेष अधिवेशनात भारताने पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे भारताने म्हटले आहे.

UNGA Emergency Session
संयुक्त राष्ट्र महासभेचे विशेष अधिवेशन

By

Published : Feb 24, 2023, 11:07 AM IST

न्यूयॉर्क :भारताने गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान कसे उपलब्ध करून देतो याची आठवण करून दिली. तसेच भारताने पाकिस्तानला आपला ट्रॅक रेकॉर्ड तपासण्याचा सल्ला दिला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 11 व्या आपत्कालीन विशेष सत्रात भारतीय समुपदेशक प्रतीक माथूर म्हणाले, 'पाकिस्तानने दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देण्याच्या त्याच्या ट्रॅक रेकॉर्डकडे पाहावे. तो उघडपणे असे करतो'.

पाकिस्तानची चिथावणी खेदजनक :माथूर म्हणाले, 'पाकिस्तानच्या खोडसाळ चिथावणीला प्रत्युत्तर न देण्यासाठी भारताने ही वेळ निवडली आहे, हे सांगण्यासाठी मी मंचावर आलो आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीला आमचा सल्ला आहे की आम्ही यापूर्वी अनेकदा प्रत्युत्तराचा अधिकार वापरला आहे. पाकिस्तानची अनावश्यक चिथावणी खेदजनक असल्याचे सांगून भारतीय समुपदेशक असेही म्हणाले की, दोन दिवसांच्या तीव्र चर्चेनंतर संयुक्त राष्ट्रातील सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आहे की संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी शांततेचा मार्ग हाच एकमेव मार्ग असू शकतो.

जागतिक दहशतवादाच्या मुद्यावर चीनची आडकाठी : भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जानेवारीमध्ये जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) 2021-22 च्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये स्थित मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांची यादी तयार केली होती. यामध्ये एकूण पाच नावांचा समावेश होता. अब्दुल रहमान मक्की (एलईटी), अब्दुल रौफ असगर (जेएम), साजिद मीर (एलईटी), शाहिद मेहमूद (एलईटी) आणि तल्हा सईद (एलईटी) अशी या यादीतील दहशतवाद्यांची नावे आहेत. चीनने या पाचही दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी तांत्रिकरित्या आडकाठी आणली होती. तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सर्व 14 सदस्यांनी या यादीला सहमती दर्शवली होती.

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला फटकारले : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला चांगलेच फटकारले. लाहोरमध्ये आयोजित फैज महोत्सवात अख्तर यांनी मुंबई दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर टीका केली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे हल्लेखोर हे नॉर्वे किंवा दुसऱ्या देशातून नाही तर पाकिस्तानातूनच आले होते, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :Judge GPF Account Closure Case : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे जीपीएफ खाते बंद केल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details