ओटावा (कॅनडा) India Canada Row :कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी कॅनडासोबतच्या राजनैतिक अडथळ्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. त्यांनी कॅनडा सरकारला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित पुरावे सादर करण्यास सांगितलंय. भारतीय राजदूतांनी शुक्रवारी एका मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले वर्मा : भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याचा आरोप केला होता. परंतु, त्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत. निज्जरच्या हत्येमध्ये कॅनडा किंवा त्याच्या सहयोगींच्या कथित सहभागाबाबत भारताला ठोस पुरावे दाखवण्यात आलेले नाहीत, यावर वर्मा यांनी भर दिला. ते म्हणाले की या संदर्भात ट्रूडो यांनी केलेल्या अनेक विधानांमुळे तपास प्रभावित झाला असून नुकसान झालंय. पुढं बोसताना वर्मा म्हणाले की, या प्रकरणाच्या तपासात भारताला कोणतीही विशिष्ट किंवा संबंधित माहिती देण्यात आलेली नाही. हत्येमध्ये भारताची भूमिका नाकारताना वर्मा म्हणाले की, मुत्सद्दींमधील कोणतेही संभाषण संरक्षित आहे आणि पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही. तुम्ही बेकायदेशीर वायरटॅपबद्दल बोलत आहात आणि पुराव्यांबद्दल बोलत आहात, असही भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले.
कोणताही वाद संवादाद्वारे सोडवला जातो : कॅनेडियन लोकांना भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी नवी दिल्लीनं गेल्या पाच-सहा वर्षांत ओटावाला 26 विनंत्या केल्या आहेत, असंही भारतीय राजदूतांनी नमूद केलं. ते म्हणाले की, आम्ही अद्याप कारवाईची वाट पाहत आहोत. उच्चायुक्तांनी असंही सांगितलं की, त्यांना रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) नं संरक्षण दिलंय. कारण त्यांना धमक्या मिळाल्या आहेत. वर्मा म्हणाले की, मला वाटते की द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराला चिथावणी दिली जाते. ते म्हणाला की, मला माझ्या सुरक्षेची चिंता आहे. मला माझ्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी आहे. नवी दिल्लीनं राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी काय केलं असं विचारलं असता, भारतीय राजदूत म्हणाले की दोन्ही बाजूंनी याची खात्री करणे आवश्यक आहे. कोणताही वाद 'व्यावसायिक संवाद आणि व्यावसायिक संवादाद्वारे' सोडवला जाऊ शकतो, असं भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले.
सोशल मीडियात खलित्सानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ-खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यानं एका कथित व्हिडिओमध्ये शीखांना 19 नोव्हेंबरनंतर एअर इंडियाच्या विमानात न जाण्यास सांगितले. दुसरीकडं त्यानं जीवाला धोका असल्याचा दावादेखील केला. पन्नूनं दावा केला की एअर इंडिया 19 नोव्हेंबरला थांबणार आहे. 19 नोव्हेंबरपासून जागतिक नाकेबंदी होणार आहे. एअर इंडियाला विमान चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही. पन्नूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत पुष्टी देत नाही.
हेही वाचा :
- India Canada Relations Explained : भारतानं कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत का पाठविलं? जाणून घ्या सविस्तर
- India Canada Row : 'भारताच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल', परराष्ट्र मंत्रालय गरजलं
- India Canada Row : 'भारतात तुमच्या जीवाला धोका, सावधगिरी बाळगा'; कॅनडानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अॅडव्हायजरी