महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

India GDP news : आयएमएफकडून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात कपात, रोजगारवाढीचे असणार प्रमुख आव्हान - डेनियल लेघ

2023 साठी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यूएससाठी 1.6 टक्के, फ्रान्स 0.7 टक्के आणि जर्मनी आणि युनायटेड किंगडमसाठी अनुक्रमे -0.1 टक्के आणि -0.7 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा विकासदर हा 5.9 टक्के असणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्था विकासदर
India GDP news

By

Published : Apr 12, 2023, 10:04 AM IST

वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विभागाचे ( आयएमएफ) प्रमुख डॅनियल ले यांनी मंगळवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबाबत पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की ती (भारत) 'अत्यंत मजबूत अर्थव्यवस्था' आहे. ते म्हणाले की, सध्या भारताचा आर्थिक विकास दराने वेगाने वाढत आहे. लेह म्हणाले की, 2022 मध्ये भारताचा विकास दर 6.8 टक्के राहणार आहे. त्याचबरोबर सध्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वात आशादायक अर्थव्यवस्था आहे, हे आपण विसरता कामा नये.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीनुसार हा अंदाजभारताच्या विकास दराचा अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5.9 टक्के असणार आहे. पण त्याची कारणे आंतरराष्ट्रीय आहेत. भारताची पायाभूत अर्थव्यवस्था मजबूत आहे. सध्या चिंता करण्यासारखे काहीही नाही. लेह यांनी पुढे सांगितले की आयएमएफकडून विकास दराचा अंदाज कमी करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. कारण, जागतिक घडामोडींचा हा परिणाम होत असतो. आम्हाला मिळालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीनुसार हा अंदाज व्यक्त केला आहे.

विकास दर ६.३ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता2020-21 मध्ये कोरोनाची महामारी असतानाही भारतासाठी आर्थिक वर्ष खूप चांगले होते. आता भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग आला आहे. भारतातील राहणीमानात सातत्याने सुधारणा होत आहे. मात्र, भारताला बेरोजगारीवर नियंत्रण ठेवताना रोजगाराच्या संधी वाढवण्यावर अधिक भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले. रोजगार वृद्धीवर भर दिल्यास पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.3 टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

रोजगार वाढविण्याचे समोर आव्हान-आरबीआयने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केलेला अंदाज हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजाहून कमी आहे. आयएमएफचे प्रमुख म्हणाले, की वाढती महागाई आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाढणारे व्याजदर यांच्यात संतुलन राखणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हान असणार आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे बँकेच्या कर्जात कपात होणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकर कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे जागतिक महामंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-A year after Imran ouster : इम्रान खान यांच्या हकालपट्टीला एक वर्ष पूर्ण, शेहबाज शरीफ यांचा पाकिस्तान ठरतोय एक टाईम बॉम्ब

ABOUT THE AUTHOR

...view details