नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आक्षेप घेतले आहेत. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेले सर्व आक्षेप आयसीसीने फेटाळून लावले. आयसीसी आणि आणि बीसीसीआय यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या विश्वचषकाच्या वेळापत्रकात प्रस्तावित केल्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याच्या पीसीबीच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
चेन्नईतील चेपॉक खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल :पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयला त्यांचा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना चेन्नईतून बंगळुरूला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूतून ते चेन्नईला पुन्हा शेड्युल करण्यास सांगितले होते. चेन्नईतील चेपॉक खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल आहे. त्यामुळे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध संघाचे नुकसान होईल याची काळजी पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला होती.
मुंबईत खेळणे सुरक्षित नाही :आयसीसीने मात्र पाकिस्तानच्या कोणत्याही आक्षेपाकडे लक्ष दिले नाही. मुंबई आणि कोलकाता येथील उपांत्य फेरीचे सामनेही निश्चित केले आहेत. राजकीय कारणांमुळे मुंबईत खेळणे सुरक्षित नसल्याचे पीसीबीने आयसीसीला सांगितले होते. मात्र आयसीसीने पाकिस्तानच्या विनंतीचा विचार केला नाही. आयसीसीने सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच आपल्या सामन्याचे वेळापत्रक बनवले आहे.
पीसीबी अध्यक्षपदाची निवडणूक ढकलली पुढे :पीसीबी अध्यक्षपदाची निवडणूक 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकाच्या घोषणेवर बोर्ड काय प्रतिक्रिया देणार याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे मंडळातील अधिकृत सूत्राने स्पष्ट केले. विश्वचषकातील आमचा सहभागासह आम्ही अहमदाबादसाठी पात्र ठरतो की 15 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीसाठी मुंबईत खेळण्यासाठी हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
अद्यापही सरकारने दिली नाही परवानगी :आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र अद्यापही पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात जाण्यासाठी सरकारने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हा एक संवेदनशील मुद्दा असल्यामुळे सरकारकडून स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरच बोर्ड पुढे जाऊ शकते. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही विश्वचषकात खेळण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे आम्ही अगोदरच आयसीसीला कळवल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
ICC विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानचे वेळापत्रक
- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर : ६ ऑक्टोबर, हैदराबाद
- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर: १२ ऑक्टोबर, हैदराबाद
- पाकिस्तान विरुद्ध भारत: १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 20 ऑक्टोबर, बेंगळुरू
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान : 23 ऑक्टोबर, चेन्नई
- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका: 27 ऑक्टोबर, चेन्नई
- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश: ३१ ऑक्टोबर, कोलकाता
- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड: ४ नोव्हेंबर, बेंगळुरू
- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड: १२ नोव्हेंबर, कोलकाता
हेही वाचा -
- ICC Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात भारत पाकिस्तान या तारखेला भिडणार, आयसीसीने जाहीर केले वेळापत्रक
- ODI World Cup 2023 Match Schedule : आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक केले जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक
- ICC Cricket World Cup 2023: या दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, जाणून घ्या भारताच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक