महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना लसीसाठी जगभरात स्पर्धा, चीनने सीडीसी प्रमुखाला दिला कोरोना लसीचा डोस - potential immunization programs

चीनने कोरोनावरील लस निर्माण करण्यात स्वतःला प्रबळ दावेदार म्हटले आहे. जगभरात मानवी चाचण्याचा टप्पा गाठलेल्या लसींपैकी 8 लसी चीनमधील आहेत.

चीन
चीन

By

Published : Jul 29, 2020, 12:57 PM IST

बिजिंग - कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच चीनने कोरोनावरील लस निर्माण करण्यात स्वतःला प्रबळ दावेदार म्हटले आहे. जगभरात मानवी चाचण्याचा टप्पा गाठलेल्या लसींपैकी 8 लसी चीनमधील आहेत. तसेच मार्चमध्ये मानवावर चाचणी करण्याची परवानगी मिळण्याच्या पूर्वीच एका चिनी सरकारी कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांवर कोरोना लसीची चाचणी केली होती.

चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राचे संचालक गाओ फू यांनीही या कोरोना लसीचा डोस घेतला आहे. हा डोस प्रभावी ठरले, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चीनच्या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीची महत्त्वाची शाखा 'अलिबाबा हेल्थ' द्वारा आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

अमेरिका आणि ब्रिटनमधील कंपन्यांसह चीनही कोरोनाची लस प्रथम बनवण्याच्या शर्यतीत आहे. यातील काही कोरोना प्रतिबंधक लस महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. तर काही कंपन्यांनी आपली लस प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. कोरोना लस करण्यात यशस्वी झाल्यास चीनचा वैज्ञानिक आणि राजकीय विजय होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details