फ्लोरिडा :अमेरिकेत पुन्हा एकदा वंशभेदामुळे हिसांचाराची घटना घडली. फ्लोरिडातील जॅक्सनविले येथे झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वंशभेदामुळे प्रेरित हल्ल्यात अनेक लोकांना गोळ्या घालून ठार केल्याचा संशय होता. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. 'हा हल्ला वांशिकतेनं प्रेरित होता', असे जॅक्सनविले शेरीफ टी. के. वॉटर्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हल्ल्यानंतर हल्लेखोरानं स्वतःवर गोळी झाडली : 'गोर्या हल्लेखोरानं हल्ल्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. हल्लेखोराजवळ असे काही पुरावे सापडले आहेत, ज्यावरून दिसून आले आहे की त्याची विचारसरणी द्वेषाची होती. याद्वारे त्याचा हल्याचा हेतू स्पष्ट झाला', असे शेरीफ टी. के. वॉटर्स यांनी सांगितलं. जॅक्सनविलच्या महापौर डोना डीगन यांनी सांगितलं की, 'गोळीबार करून अनेकांना ठार केल्यानंतर संशयित हल्लेखोराला स्टोअरमध्ये रोखण्यात आले'. या प्रकरणी जॅक्सनविले अग्निशमन आणि बचाव विभागाचे प्रवक्ते एरिक प्रोस्विमर यांनी सांगितलं की, आमचा विभाग पीडितांवर उपचार करण्यासाठी तयार आहे. मात्र, या प्रकरणात जखमी झालेल्या लोकांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.