सेटिन्जे आग्नेय युरोपीय देश असलेल्या मॉन्टेनेग्रो या पश्चिमेकडील शहरातील रस्त्यांवर शुक्रवारी एका व्यक्तीने गोळीबार केला. ज्यात दोन मुलांसह 10 जण ठार Gunman shot 10 people in Montenegro झाले. यानंतर एका वाटसरूने त्यांची गोळी झाडून हत्या केली, अशी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मॉन्टेनेग्रोचे पोलिस प्रमुख झोरान ब्राझनिन यांनी मीडियासोबत शेअर केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये सांगितले की, हल्लेखोर हा 34 वर्षीय व्यक्ती होता. ज्याची ओळख त्याच्या नावाच्या सुरुवातीच्या VB या दोन अक्षरांनी केली.
ब्राझनिनने सांगितले की, संशयिताने प्रथम 8 आणि 11 वर्षे वयोगटातील दोन मुलांना आणि सांतिजा येथील मेडोविना भागात हल्लेखोराच्या Gunman shot people in Montenegro घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या त्यांच्या आईवर रायफलने गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो रस्त्यावर गेला आणि त्याने आणखी 13 लोकांना गोळ्या घातल्या. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला. सध्या, हे स्पष्ट नाही की VB ला हे घृणास्पद कृत्य Disgusting act of VB करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले, असे ब्राझनिन म्हणाले.