टेक्सास (यूएसए): मंगळवारी टेक्सासच्या प्राथमिक शाळेत एका 18 वर्षीय बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात किमान 18 मुले ठार झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की बंदूकधारीही यात ठार झाला. मृतांच्या संख्येत तीन प्रौढांचाही समावेश आहे. राज्याचे सिनेटर रोलँड गुटेरेझ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पोलिसांनी मृत्यूबद्दल माहिती दिली होती. पण त्यामध्ये सुरुवातीला हल्लेखोराचा समावेश होता की नाही हे लगेच स्पष्ट झाले नाही.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी सांगितले की प्राथमिक शाळेतील नेमबाजाने जो उवाल्डेचा आहे त्याने हे निर्घृण कृत्य केले. "अशी माहिती मिळत आहे की त्याने आपले वाहन सोडले पार्क केले आणि हँडगनसह तो येथील रॉब प्राथमिक शाळेत घुसला. त्याच्याकडे रायफल होती अशीही माहिती मिळत आहे. परंतु त्याची अजून शहानिशा करणे बाकी आहे, असे म्हणाले. स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारानंतर शाळा बंद करण्यात आली.भ्याड हल्ला - ग्रेग अबॉट यांनी हा हल्ला अत्यंत जीवघेणा मानला आहे. त्यांच्या दृष्टीने उवाल्डे हे अगदी लहान शहर आहे, जिथे आरोपीने हा भ्याड हल्ला केला त्या शाळेमध्येही केवळ 600 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. त्याने हल्ल्याची तुलना 2012 च्या सॅंडी हूक एलिमेंटरी स्कूल शूटिंगशी केली. पण त्यांनी हे टेक्सास शूटिंग अधिक घातक आणि चिंताजनक मानले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी शूटरने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्गात शिकणाऱ्या निष्पाप मुलांना आपल्या गोळीने लक्ष्य केले आहे. 2012 च्या घटनेतही 20 मुलांना अशाच प्रकारे जीवे मारण्यात आले होते.