महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Pervez Musharraf Died : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे निधन, दुबईत घेतला अंतिम श्वास

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे दुबईत दुर्मिळ आजाराने निधन झाले. मुशर्रफ 20 जून 2001 ते 18 ऑगस्ट 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी मार्च 2016 मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला होता, तेव्हापासून ते पाकिस्तानला परतले नव्हते.

Pervez Musharraf
परवेज मुशर्रफ

By

Published : Feb 5, 2023, 11:55 AM IST

Updated : Feb 5, 2023, 12:38 PM IST

दुबई :पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

अ‍ॅमिलायडोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त : ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगने 2018 मध्ये मुशर्रफ हे अ‍ॅमिलायडोसिस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याचे जाहीर केले होते. अ‍ॅमिलायडोसिस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे जो शरीरातील अवयवांमध्ये अ‍ॅमालॉइड नावाचे प्रथिने तयार झाल्यामुळे उद्भवतो. अ‍ॅमालॉइड प्रथिनांमुळे अवयवांना योग्यरित्या कार्य करणे कठीण होते. पक्षाचे विदेश अध्यक्ष अफजल सिद्दीकी यांनी मुशर्रफ यांच्या आजारपणामुळे त्यांची मज्जासंस्था कमकुवत झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांना लंडनमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.

पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष : परवेझ मुशर्रफ 20 जून 2001 ते 18 ऑगस्ट 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. 1999 मध्ये यशस्वी लष्करी बंडानंतर ते पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष बनले. मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी ब्रिटिश भारतातील दिल्ली येथे झाला होता. 19 एप्रिल 1961 रोजी त्यांना पाकिस्तान मिलिटरी अकादमी काकुलमधून कमिशन मिळाले होते. 1998 मध्ये त्यांना जनरल पदावर बढती मिळाली आणि त्यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मुशर्रफ 2016 पासून दुबईत राहत होते. तेथे ते गेल्या आठ वर्षांपासून उपचार घेत होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुशर्रफ यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य पाकिस्तानात घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. 30 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला. 17 डिसेंबर 2019 रोजी विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना त्यांच्याविरुद्धच्या देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावली. त्यांनी मार्च 2016 मध्ये वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला. तेव्हापासून ते पाकिस्तानला परतले नव्हते.

हेही वाचा :Chinese Spy Balloon : अमेरिकेने पाडला चीनचा हेरगिरी करणारा कथित बलून ; चीनकडून निषेध व्यक्त

Last Updated : Feb 5, 2023, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details