महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Imran Khan : इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास, लाहोरमधून अटक, ५ वर्ष निवडणूकही नाही लढता येणार - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणी तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर त्यांना लगेच अटक करण्यात आली.

Imran Khan
इम्रान खान

By

Published : Aug 5, 2023, 3:07 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले आणि त्यांना काही वेळातच अटक करण्यात आली. लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक झाली आहे. जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला : पाकिस्तानातील माध्यमांच्या वृत्तानुसार इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांना पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. यापूर्वी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी त्यांची याचिका फेटाळली होती.

काय आहे तोशखाना प्रकरण : पाकिस्तानात 1974 मध्ये तोशखाना विभागाची स्थापना करण्यात आली. तोशखान्यात पाकिस्तानातील बडे नेते, सेलिब्रिटी, नोकरशहा, अधिकारी आणि इतर देशांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. येथे अनेक मौल्यवान वस्तू देखील आहेत. यावर सरकारचे नियंत्रण आहे. इम्रान खान यांच्या कारकिर्दीत तोशखान्यात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू विकल्याचा आरोप आहे. त्यातून त्यांना 14 कोटी रुपये मिळाले होते. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. ही घटना 2018 ते 2022 या कालावधीत घडली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती : तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका फेटाळण्यात आली. या खटल्याच्या कारवाईला स्थगिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. या प्रकरणी त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दोनदा अपीलही केले होते. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्यांना दिलासा मिळाला नाही.

हेही वाचा :

  1. Pakistan Blast : पाकिस्तानमधील पख्तुनख्वामध्ये बॉम्बस्फोट; 44 ठार, 200 जखमी
  2. Chinese Foreign Minster : चीनने केली बेपत्ता परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी, लगेच दुसऱ्याची नियुक्ती
  3. UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार

ABOUT THE AUTHOR

...view details