लंडन -ब्रिटनच्या पंतप्रधान पदी नियुक्त झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी पहिल्यांदाच देशाला उद्देशून भाषण केले.सरकारच्या अजेंड्याच्या केंद्रस्थानी आर्थिक अस्थिरता दूर करणे आणि देशाचा आत्मविश्वास पुन्हा बहाल करणे हे असेल. अर्थात यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील याचे सूतोवाचही सुनक यांनी पहिल्याच भाषणात केले. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना समर्थपणे करीन अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माझ्या नेतृत्वाखालील सरकार पुढच्या पिढीला, तुमच्या मुलांना आणि नातवंडांना डोक्यावर कर्ज घेऊन सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
इंग्लंडच्या पंतप्रधान पदी नियुक्तीनंतर ऋषी सुनक यांनी निवर्तमानपंतप्रधान लिझ ट्रस यांचे आभार मानले. त्यांची देशाचा विकास व्हावा याबाबतची कळकळ महत्वाची होती असे ते म्हणाले. हे एक उदात्त उद्दिष्टातून त्यांची झालेली अस्वस्थता कौतुकास्पद होती. परंतु काही चुका झाल्या. त्या वाईट हेतूने झाल्या नाहीत हेही सुनक यांनी स्पष्ट केले. आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे सुनक यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार तयार करण्यासाठी आपण सत्ता हाती घेतल्याचे सुनक यांनी सांगितले. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आपल्या पहिल्या भाषणात आर्थिक आणि राजकीय गोंधळात ब्रिटनचा विश्वास संपादन करण्याचे वचन दिले. सुनक म्हणाले की, त्यांच्या सरकारमध्ये प्रत्येक स्तरावर सचोटी, व्यावसायिकता आणि जबाबदारी असेल. ते म्हणाले की, देशाच्या भविष्यात नेतृत्व करण्यासाठी, राजकारणापेक्षा तुमच्या गरजा मांडण्यासाठी, माझ्या पक्षाच्या उत्कृष्ट परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे माझे सरकार असेल. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.