नवी दिल्ली : तारिक फतेह यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांची मुलगी नताशा हिने त्यांना 'पंजाबचा सिंह' आणि 'भारताचा सुपुत्र' संबोधले आहे. तारिक फतेह हे इस्लामबद्दलच्या त्यांच्या पुरोगामी विचारांसाठी आणि पाकिस्तानबद्दलच्या त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारलाही अनेकदा पाठिंबा दिला आहे. तारिक फतेह आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहायचे.
मुलगी नताशाचे ट्विट : तारिक फतेह यांची मुलगी नताशाने ट्विट केले की, 'पंजाबचा सिंह, हिंदुस्थानचा पुत्र, कॅनेडियन प्रेमी, सत्याचा पुरस्कार करणारा, न्यायासाठी लढणारा आणि दीन - दलितांचा आवाज, तारिक फतेह यांनी आपल्या क्रांतीची मशाल पुढे सोपविली आहे. ज्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांच्यावर प्रेम केले त्या सर्वांसोबत त्यांची क्रांती जिवंत राहील'. तारिक फतेह स्वत:ला 'पाकिस्तानात जन्मलेला भारतीय' आणि 'इस्लाममध्ये जन्मलेला पंजाबी' म्हणत. फतेह इस्लामबद्दलच्या त्यांच्या पुरोगामी विचारांसाठी आणि पाकिस्तानबद्दलच्या त्यांच्या उग्र भूमिकेसाठी ओळखले जात होते.