महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Woman Dies During Pregnancy : बाळंतपणात दर दोन मिनीटांनी एका स्त्रीचा होतो मृत्यू, यूएनचा धक्कादायक अहवाल - माता मृत्यूची ही आहेत कारणे

जगभरात २०२० मध्ये अंदाजे 287,000 माता मृत्यूच्या घटना घडल्याचे यूएनच्या अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेचे किती धिंडवडे निघाले आहेत, याची प्रचिती येते. ट्रेंड्स इन मॅटर्नल मॉर्टलिटी या यूएनच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Woman Dies During Pregnancy
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 23, 2023, 5:18 PM IST

जिनिव्हा ( स्वित्झर्लंड ) : गरोदरपण आणि बाळंतपणा दरम्यान दर दोन मिनीटांनी एका स्त्रीचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक खुलासा यूनच्या अहवालातून उघड झाला आहे. यूएनने गुरुवारी याबाबतचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार अलीकडील वर्षांमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'ट्रेंड्स इन मॅटर्नल मॉर्टलिटी' या शीर्षकाच्या अहवालात 2020 मध्ये जगभरात अंदाजे 287,000 मातांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

माता मृत्यूची ही आहेत कारणे : जगभरात माता मृत्यूचे वाढलेले प्रमाण हादरवून टाकणारे आहे. जगभरात झालेल्या माता मृत्यूच्या घटनांनी महिलांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम झाला, याचा प्रचिती येते. मात्र माता मृत्यूची नेमकी कारणे काय आहेत, याचा शोध घेतला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात गंभीर रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, गर्भधारणा होतांना मातेला झालेले संक्रमण, असुरक्षित गर्भपातामुळे उद्भवणारी गुंतागुंत आदींचा समावेश असल्याचेही यूएनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासह एचआयव्ही, एड्स आणि मलेरिया या आजारांचाही मातांचा मृत्यू होण्यास कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बाळंतपण हा महिलांसाठी सुखद काळ :जगभरात २०२० मध्ये अंदाजे 287,000 माता मृत्यूच्या घटना घडल्याने चांगलाच हादरा बसला आहे. त्यामुळे बाळंतपण हा महिलांसाठी सुखद काळ असतो. मात्र तरीही जगभरातील लाखो नागरिकांसाठी हा धक्कादायक काळ ठरला आहे. त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळायला हव्या अशी अपेक्षा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे संचालक टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी व्यक्त केली.

बाळंतपणाच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारी :ही आकडेवारी प्रत्येक स्त्रीला बाळंतपणाच्या कालावधीत गंभीर आरोग्याच्या तक्रारी निर्माण करते. त्यामुळे मातांना आणि गरोदर स्त्रियांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात असेही त्यांनी नमूद केले आहे. प्राथमिक आरोग्य सेवा स्त्रिया, मुले आणि किशोरवयीनांच्या गरजा पूर्ण करू शकतात. त्यामुळे जन्म आणि प्रसूतीपूर्व काळात काळजी घेणे, बालकांचे लसीकरण, पोषण आणि कुटुंब नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण सेवांमध्ये आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच मातामृत्यूंचे प्रमाण कमी करता येईल, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

एका वर्षात २ लाख ८० हजार मृत्यू होणे धोकादायक :एका वर्षात मातांचे २ लाख ८० हजार मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा प्रणालींचा कमी निधी, प्रशिक्षित आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचा अभाव आणि वैद्यकीय उत्पादनांसाठी कमकुवत पुरवठा साखळी आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यूएनएफपीएच्या कार्यकारी संचालक नतालिया कानेम यानी गर्भधारणा आणि बाळंतपणात इतक्या महिलांचा मृत्यू झाल्याने ही धक्कादायक गोष्टी असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : Human Avian Influenza : 'या' आजारापासून रहा सावधान, देश विदेशात वाढले रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details