हैदराबाद -गुगलचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश सेर्गे ब्रिन यांच्या पत्नीसोबत त्यांचे अफेअर असल्याच्या वृत्ताचा टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी इन्कार केला आहे. सर्जी आणि आपण मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो! मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदाच पाहिले आहे, दोन्ही वेळा आजूबाजूच्या अनेक लोकांसोबत. काहीही रोमँटिक नाही, असे मस्क यांनी ट्विट केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये मात्र ब्रिन यांच्या पत्नी निकोल शानाहान यांच्याशी मस्क यांचे कथित संबंध होते असे वृत्त दिले आहे.
अफेअर होईपर्यंत जवळचे मित्र -मस्क आणि मिस्टर ब्रिन हे अफेअर होईपर्यंत जवळचे मित्र होते, असेही त्या वृत्तामध्ये म्हटले आहे. ब्रिन यांनी जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, तसेच शानाहानपासून 15 डिसेंबर 2021 पासून वेगळे झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.