वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. 10 किमी खोलीवर भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतक्या शक्तिशाली भूकंपामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समोर आलेले नाही, परंतू तपासणी सुरू आहे.
त्सुनामी येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली : यूएसजीएस (USGS) च्या मते, गुरुवारी सकाळी न्यूझीलंडच्या उत्तरेकडील केर्मडेक बेटांवर 7.1 रिश्टर स्केलचा हादरा जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात भूकंप झाला, अशा स्थितीत भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 300 किलोमीटरच्या त्रिज्येत त्सुनामी येण्याची शक्यता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भूकंप 10 किमी खोलीवर होता. इंटरनॅशनल त्सुनामी वॉर्निंग सिस्टम (TWS) नुसार, भूकंपानंतर लगेचच सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया किंवा फिलिपाइन्सला सुनामीचा धोका नाही.