महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानला भूकंपाचा हादरा; कोणतीही जीवितहानी नाही, न्यू गिनीलाही भूकंपाचे हादरे - कोणतीही जीवितहानी नाही

Earthquake In Pakistan : पाकिस्तानात आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के बसल्यानं नागरिक चांगलेच हादरले आहेत. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (NCS) वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

Earthquake In Pakistan
संग्रहित छायाचित्र

By ANI

Published : Nov 28, 2023, 8:30 AM IST

इस्लामाबाद Earthquake In Pakistan : मंगळवारी पहाटे पाकिस्तानला भूकंपाचा धक्का बसल्यानं नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंप झाल्याची माहिती समजताच नागरिकांची मोठी धावपळ उडाली. रिश्टल स्केलवर हा भूकंप 4.2 तीव्रतेचा असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या वतीनं देण्यात आली.

पाकिस्तानला भूकंपाचा धक्का : आज सकाळी पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यानं चांगलंच हादरलं. पाकिस्तानच्या 34.36 अंश अक्षांश आणि 73.51 अंश पूर्व रेखांशावर भूकंपाचे तीव्र धक्के बसले. भल्या पहाटे भूकंपाचे धक्के बसल्यानं नागरिक चांगलेच हादरुन गेले. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. पाकिस्तानला पहाटे 3.38 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती पाकिस्तानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं (NCS) स्पष्ट केलं. हा भूकंप 10 किमी खोलीसह भूकंपाचं केंद्र 34.66 अंश उत्तर अक्षांश आणि 73.51 अंश पूर्व रेखांशावर असल्याचं निश्चित करण्यात आलं, असंही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं यावेळी आपल्या अहवालात नमूद केलं.

  • भूकंपात कोणतीही जीवितहानी नाही :पाकिस्तानच्या नागरिकांना भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं चांगलाच हादरा दिला आहे. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं स्पष्ट केलं. पाकिस्तानात भूकंप झाल्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
  • न्यू गिनीलाही भूकंपाचे हादरे :पाकिस्तानला भूकंपाचा धक्का लागण्यापूर्वी न्यू गिनीच्या समुद्र किनाऱ्यावर 6.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार पहाटे 3 च्या सुमारास न्यू गिनीला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यासह 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप Xizang इथं पहाटे 3.45 वाजता झाणवल्याचंही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Earthquake in Manipur : मणिपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; मोरोक्कोमध्ये भूकंपाने 2800 जणांचा मृत्यू
  2. Delhi Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला, दिल्लीतही जाणवले धक्के
  3. Nepal Earthquake News : भय इथले संपत नाही! आणखी एका भूकंपानं हादरला नेपाळ, शुक्रवारच्या भूकंपात 157 लोकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details