बीजिंग Earthquake In China :चीनमध्ये भूकंपाच्या हादऱ्यानं तब्बल 111 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर पश्चिम चीनमधील परिसरात हा 6.2 तिव्रतेचा भूकंप झाला आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या भूकंपात चीनमधील गांसू परिसरात 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर किंघाई प्रांतात 11 नागरिकांचा बळी गेल्याची माहिती चीनमधील वृत्तसंस्थेनं दिली आहे.
भूकंपानं 111 नागरिकांचा बळी, 200 जण जखमी :चीनमध्ये आलेल्या भूकंपात तब्बल 111 नागरिकांचा बळी गेला आहे. तर 200 नागरिक जखमी झाल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे. गांसू परिसरात 96 आणि किंघाई परिसरात 124 नागरिक जखमी झाले आहेत. किंघाईच्या सीमेपासून 5 किमी अंतरावर गांसूच्या जिशिशन काऊंटीमध्ये हा भूकंप झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं या भूकंपाची तिव्रता 5.9 इतकी नोंदवली आहे.
वीज, पाणी आणि रस्त्याचं नुकसान : चीममध्ये आलेल्या भूकंपानं नागरिकांची मोठी वाताहत केली आहे. भूकंप झालेल्या परिसरात पिण्याचं पाणी, वीज आणि रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गांसूची राजधानी असलेल्या लान्झो इथं भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृहातून बाहेर आले. या तरुणांनी सोशल माध्यमांवर भूकंप झाल्याची माहिती पोस्ट केली. भूकंप झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांचा शोध घेऊन बचावकार्याला गती देण्याचं आवाहन केलं. त्यासह भूकंपग्रस्त भागात तंबू, फोल्डींग बेड आणि आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती मदत पाठवली आहे, असं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
नेपाळमध्ये झाला होता 157 नागरिकांचा मृत्यू :नेपाळमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात 6.4 तिव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात तब्बल 157 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये झालेल्या भूकांचे हादरे राजधानी दिल्लीतही जाणवले होते. त्यामुळं दिल्लीतील नागरिकही हादरले होते. तर अफगाणिस्तानमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भूकंपात 2 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा :
- Nepal Earthquake : शक्तिशाली भूकंपानं नेपाळमध्ये हाहाकार! 132 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के
- भूकंपाच्या हादऱ्यानं नवी मुंबई, पनवेल हादरले, भूगर्भातून झाला आवाज
- Nepal Earthquake : पुण्याहून नेपाळला फिरायला गेलेले 'ते' 39 प्रवासी सुरक्षित