महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Merian Biotech cough syrup : मेरियन बायोटेकचे कफ सिरप मुलांना घातक, लहानग्यांना न देण्याचे डब्ल्यूएचओचा अहवाल - दोन कफ सिरपना निकृष्ट उत्पादनाचा दर्जा

डब्ल्यूएचओकडून मेरियन बायोटेकच्या दोन कफ सिरपना निकृष्ट उत्पादनाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याशिवाय मेरियन बायोटेकचे कफ सिरप मुलांना घातक असून लहानग्यांना न देण्याचा अहवाल डब्ल्यूएचओकडून देण्यात आला आहे. बुधवारी मेडिकल प्रोडक्शन अलर्टमध्ये डब्ल्यूएचओकडून हे नमूद करण्यात आले

Merian Biotech cough syrup
मेरियन बायोटेकचे कफ सिरप

By

Published : Jan 12, 2023, 8:16 AM IST

Updated : Jan 12, 2023, 11:39 AM IST

जिनिव्हा ( स्वित्झर्लंड) : उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील मेरियन बायोटेक या कंपनीने बनवलेल्या दोन कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाला. त्यावर आता हे कप सिरप वापरू नयेत असे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी मेडिकल प्रोडक्श अलर्टमध्ये, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की मॅरियन बायोटेकद्वारे निर्मित सबस्टँडर्ड मेडिकल उत्पादने ही 'गुणवत्तेची मानके किंवा वैशिष्ट्यांची पूर्तता करण्यात अपयशी ठरणारी उत्पादने आहेत, असे डब्ल्यूएचओने म्हटले.

डब्ल्यूएचओकडून निकृष्ट दर्जाचा शेरा : डब्ल्यूएचओकडून दोन कफ सिरपना निकृष्ट उत्पादनाचा दर्जा देण्यात आला. 22 डिसेंबर 2022 रोजी डब्ल्यूएचओला रिपोर्ट देण्यात आला. निकृष्ट वैद्यकीय उत्पादने ही अशी उत्पादने आहेत जी गुणवत्ता मानके किंवा वैशिष्ट्यांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरतात. असे डब्ल्यूएचओला त्याच्या वेबसाइटवर जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे. "अँब्रोनॉल सिरप आणि डॉक 1 मॅक्स सिरप ही त्या दोन सिरपची नावे आहेत. दोन्ही सिरपचे उत्पादन मेरियन बायोटेककडून करण्यात आले.

डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलचे नित्कृष्ठ : कफ सिरप पिल्यानंतर मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी उझबेकिस्तानमधून समोर आल्याने नोएडास्थित फार्मा मेरियन बायोटेक प्रकाश झोतात आली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये कफ सिरपचे नमुने तपासण्यात आले. त्याच्या विश्लेषणात असे आढळून आले की दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलचे नित्कृष्ठ होते.

सिरपमुळे मुलांच्या जीवाला धोका : डब्ल्यूएचओने पुढे म्हणाले की या दोन उत्पादनांना इतर देशांमध्ये देखील वितरीत करण्याचा अधिकार असू शकतो. ते इतर देशांसह भारताच्या इतर भागांमध्ये आणि अनौपचारिक बाजारपेठांमध्ये देखील सिरपचे वितरण करू शकतात. मात्र युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने म्हटले आहे की या अलर्टमध्ये संदर्भित निकृष्ट उत्पादने असुरक्षित आहेत आणि त्यांचा वापर, विशेषत: मुलांमध्ये, गंभीर आजार किंवा मृत्यूचे कारण ठरू शकते.

यूपी सरकारकडून परवाना रद्द : 22 डिसेंबर रोजी उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मॅरियन बायोटेक कंपनीने बनवलेले कफ सिरप पिल्याने मृत्यू झाला होता. या संदर्भात, उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने मंगळवारी मेरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे. औषध निरीक्षक वैभव बब्बर यांनी सांगितले की, पुरेशी कागदपत्रे सादर न झाल्याने मॅरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे. त्याशिवाय राज्य परवाना प्राधिकरणाकडून कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, सिरपच्या नमुन्यांचे निकाल येणे बाकी आहे. या घटनेवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही भाष्य केले होते. कफ सिरप ब्रोनॉल सिरप आणि डॉक 1 मॅक्समध्ये भेसळ असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नोएडास्थित मॅरियन बायोटेक फार्मा कंपनीचे सर्व उत्पादन बंद करण्यात आले आहे.

Last Updated : Jan 12, 2023, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details