कोलंबो: श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड करण्यात ( Dinesh Gunawardena elected Sri Lanka PM ) आली आहे. त्यांनी आज पंतप्रधान कार्यालय, फ्लॉवर रोड, कोलंबो येथे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ ( Dinesh Gunawardena took oath as PM ) घेतली. दिनेश गुणवर्धने हे खासदार आहेत. ते यापूर्वी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 2020 च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र संबंध मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याआधी गुरुवारी, देशाच्या आर्थिक संकटाच्या ( Economic crisis in Sri Lanka ) वेळी संसदेचे नेते दिनेश गुणवर्धने श्रीलंकेतील कोलंबो येथील बौद्ध मंदिरात ( Buddhist temple in Colombo ) पोहोचले. तेथे ते रानिल विक्रमसिंघे यांची वाट पाहत होते, ज्यांची संविधानानुसार आठवे कार्यकारी राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची आर्थिक स्थिती इतकी बिघडली आहे की, लोक रस्त्यावर उतरले आणि तीव्र निषेध केला.