नवी दिल्ली: चिनी हेरगिरीच्या फुग्याचा फटका भारतालाही बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी गुप्तहेर बलूनने भारताच्या लष्करी तळांच्या प्रतिमाही मिळवल्या आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनने भारत आणि जपानसह अनेक देशांना लक्ष्य करून गुप्तचर फुग्यांचा ताफा चालवला आहे. त्याद्वारे संवेदनशील ठिकाणांची माहिती जमा करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गंभीर घटना आहे.
अमेरिकेने फुगा पाडल्यानंतर आले समोर:अमेरिकन सैन्याने त्यांच्या देशातील संवेदनशील प्रतिष्ठानांवर घिरट्या घालणारा एक चिनी पाळत ठेवणारा फुगा खाली पाडल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.अटलांटिक महासागरात दक्षिण कॅरोलिनाच्या किनार्याजवळ एका लढाऊ विमानाने पाडलेल्या चिनी पाळत ठेवणार्या बलूनला अमेरिकन अधिकार्यांनी शोधून काढले आहे. भारतासह आमचे मित्र आणि इतर मित्र देशांना या शोधाची माहिती दिली असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध देशांच्या लष्करी तळांची माहिती घेतली:अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनुसार, चिनी गुप्तचर फुग्याने भारत, जपान, व्हिएतनाम, तैवान आणि फिलिपाइन्ससह इतर अनेक देशांच्या विविध लष्करी तळांची माहिती गोळा केली आहे. वृत्तपत्रानुसार, चीनच्या दक्षिण किनार्यावरील हैनान प्रांतातून ते ऑपरेट केले जात होते. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, हे फुगे पीआरसी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) फुग्यांच्या ताफ्याचा भाग आहेत, जे पाळत ठेवण्यासाठी विकसित केले गेले आहेत. ते म्हणाले की, हे फुगे इतर देशांच्या सार्वभौमत्वाचेही उल्लंघन करतात.