काठमांडू: नेपाळ सरकारने शुक्रवारी संध्याकाळी सीरियल किलर चार्ल्स शोभराजची तुरुंगातून सुटका केली, (Charles Sobhraj Released) आणि आवश्यक इमिग्रेशन मंजुरी मिळाल्यानंतर त्याला फ्रान्सला पाठवले. (Nepal jail) 'बिकिनी किलर' आणि 'द सर्पंट' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभराजची नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Nepal Supreme Court ) आदेशानुसार शुक्रवारी दुपारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला फ्रान्सला पाठवण्यात आले. बुधवारी सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या कारणांमुळे शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या हद्दपारीच्या वेळी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. नेपाळच्या इमिग्रेशन विभागाने सांगितले की पुढील 10 वर्षे नेपाळमध्ये परत न येण्याच्या अटीवर त्याला हद्दपार करण्यात आले होते. त्याच्याकडे वैध पासपोर्ट नसल्याने सरकारने त्याला हद्दपार करण्यापूर्वी प्रवासी दस्तऐवज जारी केले होते. शोभराज कतार एअरलाइन्सच्या नियमित फ्लाइटने निघाले आणि दोहा येथे थांबल्यानंतर पॅरिसला पोहोचले.
शोभराज यांनी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला आणि तिल प्रसाद श्रेष्ठ यांच्या संयुक्त खंडपीठाने फ्रेंच नागरिकाला १५ दिवसांत त्याच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे सांगून त्याची सुटका करण्याचे आदेश दिले. शोभराजने 19 वर्षे आणि दोन महिने काठमांडू येथील सेंट्रल जेलमध्ये काढले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला गुरुवारी सोडण्यात येणार होते, काही अंतर्गत प्रक्रियेमुळे, ज्यामध्ये इमिग्रेशन विभागातील कागदपत्रे आणि इतर गोष्टींचा समावेश होता, शुक्रवारी दुपारी त्याची सुटका शक्य झाली.