महाराष्ट्र

maharashtra

Joe Biden Health : जो बायडन यांच्या छातीतून काढल्या कर्करोगाच्या पेशी, प्रकृती उत्तम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन छातीतून बेसल सेल कार्सिनोमा काढण्यात आला आहे. बेसल पेशी कर्करोगाच्या सर्वात सामान्य आणि सहज उपचार करता येणाऱ्या पेशी आहेत. बायडन यांची तब्बेत आता उत्तम आहे.

By

Published : Mar 4, 2023, 7:30 AM IST

Published : Mar 4, 2023, 7:30 AM IST

Joe Biden Joe Biden
जो बायडन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे गेल्या एक महिन्यात ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या छातीतून बेसल सेल कार्सिनोमा काढण्यात आला होता, असे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. हा त्वचेच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे. बायडन यांच्या डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता नाही. व्हाईट हाऊसचे डॉक्टर केविन ओ'कॉनर, ज्यांनी बायडन यांच्यावर दीर्घकाळ उपचार केले आहेत ते म्हणाले की, 16 फेब्रुवारी रोजी बायडन यांच्या शरीरातील कर्करोगास कारणीभूत सर्व पेशी यशस्वीरित्या काढण्यात आल्या आहेत.

बायडन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 'फीट' :80 वर्षांच्या बायडन यांना ओ'कॉनर यांनी निरोगी, दमदार आणि फिट घोषित केले आहे. याचाच अर्थ ते पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करू शकतात. कॉनर म्हणाले की, बायडन यांची तब्बेत आता उत्तम आहे. मात्र ते त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीचा भाग म्हणून त्वचेची देखील तपासणी नियमित सुरू ठेवतील. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक 5 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.

या आधी पण झाले आहेत उपचार : बेसल पेशी कर्करोगाच्या सर्वात सामान्य आणि सहज उपचार करता येणाऱ्या पेशी आहेत. ओ'कॉनर म्हणाले की, या पेशी इतर कर्करोगांसारख्या पसरत नाहीत. परंतु त्या आकाराने वाढू शकतात, म्हणूनच त्यांना काढून टाकले जाते. बायडन हे अध्यक्ष बनण्याआधी त्यांच्या शरीरातून त्वचेच्या कर्करोगाच्या अनेक पेशी काढून टाकल्या गेल्या आहेत. ओ'कॉनर यांनी म्हटले की, सर्वांनाच माहित आहे की आपल्या तारुण्यात बायडन यांनी बाहेरच्या सूर्यप्रकाशात बराच वेळ घालवला आहे.

बायडन कुटुंबीयांचा कर्करोगाविरुद्ध लढा : जानेवारीत जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन यांच्या उजव्या डोळ्यातून आणि छातीतून दोन बेसल सेल काढण्यात आले होते. बेसल सेल कार्सिनोमा हा मंद गतीने वाढणारा कर्करोग आहे जो सामान्यतः त्वचेच्या पृष्ठभागापुरता मर्यादित असतो. हा रोग क्वचितच गंभीर गुंतागुंत निर्माण करणारा किंवा जीवघेणा बनतो. बायडन कुटुंबीय दीर्घकाळापासून कर्करोगा विरुद्धच्या लढ्याचे समर्थन करत आहेत. त्यांचा मोठा मुलगा ब्यू 2015 मध्ये मेंदूच्या कर्करोगाने मरण पावला होता.

हेही वाचा :Vivek Ramaswamy : आणखी एक भारतीय वंशाचा नागरिक लढवणार अध्यक्षपदाची निवडणूक, ट्रम्प यांना देणार टक्कर!

ABOUT THE AUTHOR

...view details