लंडन : येथे वार्षिक ट्रपिंग द कलर परेडची तालीम सुरू आहे. दरवर्षी जून महिन्यात ही राजाच्या अधिकृत जन्मदिवस साजरा करण्यासाठी ही परेड केली जाते. रखरखत्या उन्हातया परेडची तालीम सध्या लंडनमध्ये सुरू आहे. या तालमीची तपासणी प्रिन्स विल्यम करत होते. त्याचवेळी एक ब्रिटिश सैनिकाला भोवळ आली आणि खाली पडला. उष्णता अधिक असल्यामुळे तो सैनिक बेशु्द्ध झाला.
वाद्य वाजवताना बेशुद्ध झाला :दरम्यान ब्रिटिश हेल्थ सिक्योरिटी एजन्सीने दक्षिण इंग्लडमधील तापमान वाढीचा इशारा दिला होता. अशा उन्हात ही तालीम केली जात होती. फॉक्स न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. लंडनमध्ये जवळपास 30 अंश सेल्सिअसच्या तापमान आहे, इतक्या उष्णतेत सैनिकांनी लोकरीचे अंगरखे आणि अस्वलांच्या टोपी घालून तालीम करत होते. परेडची तयारी चालू असताना बेशुद्ध झालेला सैनिक हा ट्रॉम्बोनिस्ट आहे. परेडमध्ये ट्रॉम्बो हे वाद्य असून ते वाजवत असताना या सैनिकाला भोवळ आली आणि तो खाली पडला. काही वेळातनंर सैनिक ट्रॉम्बो वाजवण्यासाठी परत उठला. त्यानंतर डॉक्टर त्याच्या मदतीला आले. दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने दक्षिण इंग्लंडसाठी उष्ण हवामानाचा इशारा जारी केला आहे. हा कार्यक्रम ट्रूपिंग द कलरसाठी एक तालीम होता, प्रत्येक जूनमध्ये सम्राटाच्या अधिकृत वाढदिवसानिमित्त आयोजित वार्षिक लष्करी परेड. किंग चार्ल्स तिसरा 17 जून रोजी समारंभाची देखरेख करतील.